शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचं अजूनही तळ्यात मळ्यात?; विरोधकांच्या बैठकांना जाणार, पण यूपीएचा भाग नाही होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 08:56 IST

राज्यात काँग्रेससोबत सत्तेत असलेली शिवसेना राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसप्रणित यूपीएचा भाग नाही

पुणे: भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असलेली शिवसेना यापुढे काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या बैठकांमध्ये दिसणार आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याआधी शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडली. शिवसेना आपली स्वतंत्र ओळख जपेल, अशी भूमिका त्यावेळी पक्षाकडून घेण्यात आली होती. मात्र आता राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडीसोबत (यूपीए) असेल, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीविरोधात रणनीती निश्चित करण्यासाठी सोमवारी विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना अनुपस्थित होती. त्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विसंवादातून हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना यापुढील बैठकांना हजर राहणार का, या प्रश्नाला होकारार्थी उत्तर दिलं. 'होय, आम्ही नक्कीच विरोधी पक्षांच्या बैठकांना उपस्थित राहू,' असं राऊत म्हणाले. 'आम्ही सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातल्या बैठकीला हजर राहिलो असतो. मात्र काहीतरी विसंवाद झाला. या बैठकीला केवळ मुख्यमंत्र्यांनी हजर राहायचं आहे असं आम्हाला वाटलं. मात्र पक्षाचा कोणताही वरिष्ठ नेता या बैठकीला उपस्थित राहू शकतो, हे आम्हाला नंतर समजलं. थोडा संभ्रम निर्माण झाल्यानं आम्ही त्या बैठकीला उपस्थित राहिलो नाही,' असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. शिवसेना यूपीएचा भाग होण्यास तयार आहे का, या प्रश्नावर राऊत यांनी सावध पवित्र घेतला. 'यूपीएमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव मिळाल्यास पक्षातल्या नेत्यांची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल,' असं राऊत म्हणाले. आम्ही आता एनडीएत नाही. आम्ही सध्या तरी कोणत्याही गटाचा भाग नाही. राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर, राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयावर यूपीएनं भूमिका घेतल्यास शिवसेना विरोधी पक्षांसोबत जायचं का याबद्दलचा निर्णय घेईल. महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर आम्ही यूपीएसोबत असू, असं राऊत पुढे म्हणाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसBJPभाजपा