शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

“प्रत्यक्षात सगळे आलबेल नाही, देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे नवी जाहिरात झळकली”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 12:05 IST

Sanjay Raut: हे सरकार पुढील २ महिन्यात अपात्र ठरेल आणि पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असा दावा संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut: वर्तमानपत्रातील जाहिरातीवरून विरोधक आता सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार निशाणा साधत आहेत. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी याबाबत सारवासारव करायला सुरूवात केली असताना भाजप नेत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. प्रत्यक्षात सगळे काही आलबेल नाही, देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे नवी जाहिरात झळकली, असा दावा संजय राऊत यांनी केला.

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या टॅगलाईनखाली एक जाहिरात देण्यात आली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिरिक्त कोणाही अन्य नेत्याचा फोटो देण्यात आला नव्हता. यावरून नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यानंतर मात्र भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो असलेली जाहिरात देण्यात आली. यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांसह शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो देण्यात आले आहेत. यावरून संजय राऊतांनी टीका केली.

देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे नवी जाहिरात झळकली

आधीच्या जाहिरातीवरून आम्ही प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, आता भाजपच्या आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे नवी जाहिरात झळकलेली दिसते. पडद्यामागे काय गोष्टी घडल्यात हे मला माहिती आहे. जाहिरातीचा प्रकार हा सगळा हास्यास्पद प्रकार झाला. त्यांच्या मनात काय ते यावरून स्पष्ट झाले. त्यानंतर आता नवीन जाहिरातीत चित्र बदलेले असले तरी प्रत्यक्षात सगळे आलबेल नाही, हे स्पष्ट दिसत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्या प्रॉक्सी वॉर सुरू झाले आहे. सरकार कोसळेपर्यंत ते तसेच राहील, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा स्पष्ट आहे. विधानसभा अध्यक्षांनी निकाल देण्यापासून पळण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार निकाल द्यावा लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. हे सरकार पुढील २ महिन्यात अपात्र ठरेल आणि पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे हे सरकार कोसळेल, असा दावाही संजय राऊत यांनी केला. शिवसेना शिंदे गटातील मंत्री सर्व काही ठीक आहे, असे जे दाखवत आहेत, ते उसने अवसान आहे. भविष्यात काय होणार, हे त्यांनाही माहिती आहे, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस