शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

“संजय राऊत नावाचा ब्रँड माझ्या पाठिशी, आजही मला १०० कोटींची ऑफर”; सुनील राऊतांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 11:27 IST

Maharashtra Politics: माझ्यावर ३५ कोटींचे कर्ज आहे. जनतेची कामे केली, पण सरकार मला पैसे देत नाही, असे सुनील राऊतांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष अद्यापही कायम आहे. अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत, शिंदे गटात प्रवेश करत आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यातील काही ठिकाणी दौरे करताना दिसत असले, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यभरातून पाठिंबा वाढत असल्याचे चित्र आहे. यातच आता ठाकरे गटाचे आमदार आणि संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी मोठा दावा केला आहे. सुनील राऊतांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे सांगितले जात आहे. 

शिवसैनिकांना संबोधित करताना सुनील राऊत म्हणाले की, संजय राऊत यांनी भाजपसमोर जर गुडघे टेकले असते. तर ते साडेचार महिने जेलमध्ये गेले नसते. पण त्यांना ते कधीही मान्य नव्हते. ते जेलमध्ये असतानाचे त साडेचार महिने माझ्या घरच्यांनी कसे काढले हे फक्त आम्हालाच माहिती आहे. सगळे काही सहन केले परंतु आम्ही पक्ष सोडला नाही. सोडणारही नाही, असे सुनील राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. 

संजय राऊत नावाचा ब्रँड माझ्या पाठिशी, मला १०० कोटींची ऑफर

मला याआधी शंभर कोटींची ऑफर होती आणि आज सुद्धा ऑफर आहे. कारण मी स्वतः आमदार आहेतच पण माझा ब्रँड संजय राऊत माझ्यामागे असल्यामुळे मला शंभर कोटींची ऑफर आहे. अशा कितीही ऑफर आल्या तरी आम्ही आमचा विचार बदलणार नाही. शंभर कोटी घेऊन माझ्यासारखा निष्ठावंत शिवसैनिक बदलणार नाही, असा दावा सुनील राऊत यांनी केला आहे. तसेच आमचीच माणसे विकत घेऊन जातात. आमच्याच माणसांना आमच्यासमोर उभे करतात. मला एकही रुपयाचा फंड सरकारकडून मिळत नाही. माझ्यावर ३५ कोटींचे कर्ज आहे. ३५ कोटींची काम केली पण सरकार मला पैसे देत नाही, असा आरोप सुनील राऊत यांनी केला आहे. 

दरम्यान, माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केला तेव्हा त्यांनी सुनील राऊत यांच्याशी आपले पटत नसल्याचे सांगितले. यावर बोलताना, १० दिवसांपूर्वी उपेंद्र सावंत मला म्हणाला की, मला सुद्धा ऑफर आहे. निधी करिता १५ कोटी आणि पाच कोटी कॅशची ऑफर आहे. त्यावेळी तो मला म्हणाला मी निष्ठावंत आहे मी घरी बसेल पण मी शिंदे गटात जाणार नाही. नंतर मी त्याला खूप फोन केले. पण त्याने माझे फोन घेतले नाहीत. नंतर मी त्याच्या बहिणीला फोन केला आणि मी तिला म्हणालो की, मी नसतो तर तो आज जेलमध्ये असता. माझ्याकडे त्याच्या चार ते पाच क्लिप अशा आहेत की त्या जर मी सोशल मीडियावर टाकल्या तर तो आपल्या मुलीला आणि बायकोला तोंड दाखवणार नाही. परंतु अशा गोष्टी करणे योग्य नाही हे आम्हाला कळते. मी उद्धव साहेबांना सांगितले की, पंधरा कोटींचा फंड आणि पाच कोटी कॅशवर उपेंद्र सावंत पक्ष सोडून चालला आहे, असे सुनील राऊत म्हणाले.

 

टॅग्स :Sunil Rautसुनील राऊतSanjay Rautसंजय राऊत