शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Maharashtra Politics: “भिडे गुरुजी आता अमृता वहिनींना जाब विचारतील का?”; ‘त्या’ विधानावरुन सुषमा अंधारेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 18:56 IST

Maharashtra News: टिकलीवरुन महिला पत्रकाराला बोलणारे भिडे गुरुजी अमृता वहिनीच्या वक्तव्यावर बोलतील का, अशी विचारणा सुषमा अंधारेंनी केली आहे.

Maharashtra Politics: छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद यांसह अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. यातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळख असलेल्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या एका विधानाचा आधार घेत, भिडे गुरुजी (Sambhaji Bhide Guruji) आता अमृता वहिनींना जाब विचारतील का, असा सवाल सुषमा अंधारेंनी केला आहे. 

मुंबईतील पत्रकार महिलेला टिकली लावली नाही म्हणून मी प्रतिक्रिया देणार नाही, असे भिडे गुरुजी म्हणाले होते. त्यानंतर अलीकडेच अमृता फडणवीस यांनी मंगळसूत्र घातल्यावर मला गळा आवळल्यासारखे होते, असे विधान केले होते. यावरून, संस्कृती जपणारे भिडे गुरुजी आता अमृता वहिनींनाही जाब विचारतील का? टिकलीवरुन महिला पत्रकाराला बोलणारे भिडे गुरुजी अमृता वहिनीच्या मंगळसुत्रावरील वक्तव्यावर बोलतील का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या. 

राज्यपालांविरोधात कारवाई करणे गरजेचे असताना राज्यकर्ते गप्प का?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला आहे. त्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. त्यावरूनही सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. राज्यपाल यांच्या विरोधात कारवाईसाठी पुढाकार घेणे गरजेचे असताना राज्यकर्ते मात्र गप्प का? अशी विचारणा अंधारे यांनी केली. तसेच शिंदे गटातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावरही चौफेर टीका केली. 

दरम्यान, भोंडेकर यांनी सरकारकडून सुमारे ६ कोटी रुपयांच्या अर्थ सहाय्याने फॅक्टरी उभी केली. आता फॅक्टरी बंद असून, त्या ठिकाणी टोलेजंग रिसॉर्ट उभे आहे. त्यांनी कोट्यवधींची माया जमवली असून, त्यांचे वडील साधे कारकून होते. त्यांनी ही माया कुठून जमवली? सध्या भोंडेकर यांच्याकडे आलिशान गाड्या, १६ हजार स्क्वेअर फुटाचा बंगला, सहा प्लॉट, मेडिकल कॉलेज, राईस मिल, शेती आहे. नगर पालिकेची परवानगी नसताना सात मजली इमारत बांधकाम करण्यात आले, असा मोठा दावा सुषमा अंधारे यांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीAmruta Fadnavisअमृता फडणवीस