शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 18:22 IST

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: भास्कर जाधव हे खोटारडे आहेत. एखाद्या व्यक्तीला बदनाम कसे करायचे हे भास्कर जाधव यांच्याकडू शिकावे, अशी टीका करण्यात आली आहे.

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होते, मी तेव्हा बोललो. मी आजही बोलेन. उद्याही बोलेन. मला मंत्रिपद का मिळायला नको, हे मला कोणी सांगायला हवे. कार्यकर्ते कमी होत आहे, म्हणून निवृत्ती घ्यायचे काहीच कारण नाही. ३९ जागांपैकी मी एकटा निवडून आलो आहे. शेवटी आठ-आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असे वाटते की, आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळे कारण नाही, असे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले होते. यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कोकणातील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी भास्कर जाधव यांच्यावर सडकून टीका केली आहे. 

एकनाथ शिंदे सुरतला गेले, होते तेव्हा भास्कर जाधव हे पण सुरतपर्यंत आले होते, ते सुरतच्या बॉर्डरपर्यंत जाऊन आले. पण एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, तुम्ही येऊ नका, असा दावा करतानाच भास्कर जाधव नौटंकी करत आहेत. उद्धव ठाकरेंकडे येऊन चूक केली असे ते म्हणतात. गुहागरची जनता आता भास्कर जाधव यांना संन्यास देणार आहे, ते फक्त १२०० मतांनी निवडून आलेले आहेत, या शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला. ते मीडियाशी बोलत होते. 

नौटंकी करण्यात भास्कर जाधव यांचा हात कोणी पकडू शकणार नाही

भास्कर जाधव जे बोलले तेवढा तो मोठा माणूस नाही. १९९५ आणि २००० मध्ये मीच बाळासाहेबांना सांगून त्यांना तिकीट द्यायला सांगितले होते. नौटंकी करण्यात भास्कर जाधव यांचा हात कोणी पकडू शकणार नाही. भास्कर जाधव हे खोटारडे आहेत.  एखाद्या व्यक्तीला बदनाम कसे करायचे हे भास्कर जाधव यांच्याकडू शिकावे, अशी टीका रामदास कदम यांनी केली. 

दरम्यान, भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहेत, शिवसेनेचे ते प्रमुख नेते आहेत. राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे. ते अत्यंत चाणाक्ष नेते आहेत. शिवसेनेच्या वाढीत त्यांचे नक्कीच योगदान आहे. आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत. भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत. कडवट शिवसैनिक आहेत. आक्रमक आणि छान बोलतात, छान लढतात, आमच्या भास्कर जाधव यांच्या मनात काय आहे? त्यांच्या मनात काय वेदना आहेत? ते आम्ही नक्की समजून घेऊ. ते आमचेच आहेत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRamdas Kadamरामदास कदमBhaskar Jadhavभास्कर जाधव