शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

“मनसेच्या येण्याने महायुतीची ताकद वाढली, जागा जिंकण्यात मोठे योगदान राहील”: श्रीकांत शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 15:19 IST

Shrikant Shinde News: राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर या निर्णयाचे स्वागत शिवसेना शिंदे गटासह महायुतीतील अन्य पक्षांनी केले आहे.

Shrikant Shinde News: मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तसेच लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा करून मनसैनिकांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले. राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे यांच्या निर्णयाचे भाजपासह महायुतीतील अन्य पक्षांकडून स्वागत केले जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. यासाठी खूप खूप धन्यवाद देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाने प्रभावित होऊन, गेल्या १० वर्षात पंतप्रधान मोदी यांनी ज्या प्रकारे देशात विकास केला आहे. देशाला एक सक्षम नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या समर्थनामुळे महायुतीची ताकद महाराष्ट्रात वाढली आहे. येणाऱ्या काळात महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्यात मनसेचे मोठे योगदान असेल, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

देशात नरेंद्र मोदी मोठ्या प्रमाणावर विकास करत आहेत

राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. पाठिंबा देताना त्यांनी कुठलीही अट ठेवली नाही. आज देशात नरेंद्र मोदी मोठ्या प्रमाणावर विकास करत आहेत. मोदींच्या नेतृत्वासाठी राज ठाकरेंनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत केले. सस्नेह स्वागत ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या!, असे फडणवीस यांनी म्हटले.  

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेRaj Thackerayराज ठाकरेMahayutiमहायुती