शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

माफीचा साक्षीदार होण्यासाठी भाजपने स्वतंत्र कक्षच उघडला आहे का?, शिवसेनेचा बोचरा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 10:18 IST

'महाराष्ट्रात तर मंगळसूत्र चोरांच्या टोळीपासून अनेक ‘वाल्या’ शुद्ध-शुचिर्भूत होण्यासाठी माफीचे साक्षीदार बनले व भाजपने त्यांना पवित्र करून घेतले,' शिवसेनेचा निशाणा

'प्रश्न सचिन वाझेचा नसून नैतिकतेचा आहे. आज भारतीय जनता पक्षात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक माफीचे साक्षीदार बनून घुसले आहेत व शांत झोपले आहेत. बँका बुडवणारे, काळा पैसा पांढरा करणारे अनेक पांढरपेशे गुन्हेगार माफीचे साक्षीदार बनून भाजपवासी झाले,' असे म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला.

'महाराष्ट्रात तर मंगळसूत्र चोरांच्या टोळीपासून अनेक ‘वाल्या’ शुद्ध-शुचिर्भूत होण्यासाठी माफीचे साक्षीदार बनले व भाजपने त्यांना पवित्र करून घेतले. मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आणि अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवणाऱया आरोपीसदेखील आज माफीचा साक्षीदार करून उद्या त्याला भाजपवासी केले तर आश्चर्य वाटायला नको. माफीचा साक्षीदार होण्यासाठी भाजपने स्वतंत्र कक्षच उघडला आहे काय?,' असा सवालही शिवसेनेने केलाय. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर जोरदार निशाणा साधला.

काय म्हटलंय अग्रलेखात?'वाझेला सीबीआयने राजकीय फायद्या-तोटय़ासाठी माफीचा साक्षीदार करावे हे नीतिमत्तेस धरून नाही. अंबानी यांच्या अँटेलिया बंगल्याजवळ गाडीत स्फोटके ठेवून वाझे याने आधी सनसनाटी निर्माण केली. त्यानंतर त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याची हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणांचे सूत्रधार वाझे व परमबीर सिंह आहेत. परमबीर सिंह यांना केंद्राने व कोर्टाने या प्रकरणात सरळ सरळ अभय दिले व आता परमबीर सिंह यांचा हस्तक वाझे यालाही माफीचा साक्षीदार केले जात आहे,' असे शिवसेनेने म्हटले आहे.

‘कोणताही पुरावा नाही’'परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप लावला, पण आरोपाला पुष्टी देणारे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत. तरीही ईडी व सीबीआयने देशमुख यांच्या घरावर दोनशे वेळा धाडी घातल्या. देशमुख आता तुरुंगात आहेत. परमबीर सिंग करूनसवरून मोकळे आहेत व वाझे यालाही अभय मिळत आहे. यालाच कायद्याचे राज्य म्हणायचे काय? सीबीआयसारखी केंद्रीय संस्था सचिन वाझेला माफीचा साक्षीदार बनवत आहे हा प्रकार साधासरळ नाही,' असे शिवसेनेने नमूद केलेय.

‘हे कायद्याला अपेक्षित नाही’'वाझेला माफीचा साक्षीदार करणे म्हणजे गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्यासारखेच आहे व कायद्याला हे अपेक्षित नाही. या सगळय़ा प्रकरणात मेख वेगळीच आहे. मला साफीचा साक्षीदार करा, असा विनंती अर्ज वाझेने केला व हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. न्यायालयाने वाझेला दिलासा देताना अट काय घातली? माफीचा साक्षीदार करण्यास परवानगी देतो, पण सीबीआयला खरे खरे सांगा. खरे सांगायचे म्हणजे काय? जो खटला खोटेपणावर उभा आहे, त्यातला सगळय़ात खोटारडा गुन्हेगार आता माफीचा साक्षीदार बनून खरे काय सांगणार? त्यामुळे वाझे हा सीबीआयचा माफीचा साक्षीदार आहे की भारतीय जनता पक्षाचा, हा प्रश्न अनेकांना पडला असेल.' असेही शिवसेनेने म्हटलेय. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाsachin Vazeसचिन वाझे