शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Sena:"जनता शिंदे गटाची गाढवावरून धिंड काढणार, उद्धव ठाकरे त्यांना राजकारणातून उठवणार’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 11:30 IST

Sanjay Raut: आज तुम्ही घोड्यावर बसलेले आहात, मात्र काही दिवसांनी राज्यातील जनता तुमची गाढवावरून धिंड काढणार, असा इशाराही संजय राऊत यांनी बंडखोरांना दिला आहे. 

मुंबई - खरी शिवसेना कुणाची हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टपर्यंतची मुदत दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील बंडखोरांवर घणाघाती टीका केली आहे.  आज तुम्ही घोड्यावर बसलेले आहात, मात्र काही दिवसांनी राज्यातील जनता तुमची गाढवावरून धिंड काढणार, असा इशाराही संजय राऊत यांनी बंडखोरांना दिला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग किंवा अन्य यंत्रणा काय आहेत हे सांगण्याची गरज नाही. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर दिल्लीच्या आदेशाने, महाराष्ट्र द्वेष्ट्यांच्या आदेशानं ही वेळ आणली आहे, बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा वरून पाहतोय. आज तुम्ही घोड्यावर बसलेले आहात, उद्या लोक तुमची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही, माझे शब्द लिहून ठेवा. 

तुम्हाला राज्यातील जनता राजकारणातून उठवणार आहेच. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला शिवसैनिकांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय. हे पैसे दिलेले फोडलेले लोक नाही आहेत. बंडखोर आम्ही उठाव केला, असं म्हणताहेत, पण कसला उठाव? या उठाव मधील उठा म्हणजे उद्धव ठाकरे आहे, ते तुम्हाला उठवल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना कुणाची पुरावे द्यावे लागणे हे दुर्दैव असल्याचे सांगत, संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, खरी शिवसेना कुणाची हे पुरावे सादर करण्याची वेळ आणावी, यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव नाही. तुम्ही फुटलेले आहात, वेगळा गट तयार केला आहात. तुम्ही तुमच्या नवीन संसारात सुखाने राहा. पण दिल्लीश्वरांना शिवसेना संपवायची आहे, त्यांचं हत्यार म्हणून यांना वापरलं जातंय. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहोत. मराठी माणसाच्या हृदयात शिवसेनेला स्थान आहे. आज आमच्यावरती पुरावे सादर करण्याची वेळ आणताय, हे पाप तुम्हाला फेडावं लागेल. ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घातलेत. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजिर खुपसलाय, ज्यांनी शिवसेनेवर पुरावे सादर करण्याची वेळ आणलीय त्यांना राज्याची जनता माफ करणार नाही, आई जगदंबा माफ करणार नाही. पुरावा काय पाहिले या राज्याची जनता हाच पुरावा आहे. सीमाप्रश्नाच हुतात्मा झालेले शिवसैनिक हाच पुरावा आहे. या राज्याच्या मातीत कणाकणात मराठी माणसाच्या रक्तात शिवसेना आहे, हा पुरावा आहे. १०-२० माणसं फोडली म्हणजे हा पुरावा होऊ शकत नाहीत. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना