शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मोदी @ ९ पासून मित्र शिंदेंची शिवसेना दूरच; सामावून घेण्याबाबत अद्याप चर्चा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 07:07 IST

भाजपच्या मंत्र्यांनी आपापल्या विभागामार्फत हे अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र त्या बाबत शिवसेनेच्या मंत्री कार्यालयांमध्ये कोणत्याही हालचाली दिसत नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल ३० मे पासून राज्यात सुरू होणाऱ्या मोदी @ ९ या अभियानापासून भाजपचा मित्र असलेली शिवसेना अद्याप दूरच आहे. त्यामुळे युतीचे सरकार असूनही केवळ भाजपच्या वतीनेच हे अभियान राबविले जात असल्याचे दिसत आहे. 

भाजपच्या मंत्र्यांनी आपापल्या विभागामार्फत हे अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र त्या बाबत शिवसेनेच्या मंत्री कार्यालयांमध्ये कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. आम्हाला तशा  सूचना आलेल्या नाहीत असे दोन मंत्र्यांकडील पीए, पीएस यांनी सांगितले. 

भाजपने हे अभियान यशस्वी करण्यासाठी चंग बांधला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अभियान समितीचे प्रमुख आ. प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तयारीला वेग दिला आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, देश पातळीवर हे अभियान भाजपच्याच माध्यमातून राबविले जाणार आहे. त्यामुळे मित्र पक्षाला त्यात सामावून घेण्यात आलेले नाही. मोदी सरकारचे महाराष्ट्रासाठीचे भरीव योगदान हीच अभियानाची थीम असेल. दोन्ही पक्षांकडील खात्यांमार्फतची कामे लोकांसमोर जाणार आहेत.   

समन्वय समिती अद्याप नाही जाणकारांच्या मते शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन ११ महिने होत आले तरी दोन पक्षांच्या नेते/मंत्र्यांची समन्वय समिती अद्याप स्थापन झालेली नाही. अशी समिती असती तर मोदी @ ९ हे अभियान संयुक्तपणे राबविता आले असते.   

मोदी @ ९ हे अभियान राबविणे व त्यात शिवसेनेचा सहभाग याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.- शंभूराज देसाई, मंत्री, उत्पादन शुल्क

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा