शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या नादाला लागू नका, मी अजून...;संजय राऊतांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 15:54 IST

मला जेलमध्ये घाला, तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? तुम्ही कायद्याचे बाप झालात का? असा सवाल संजय राऊतांनी राणेंना विचारला आहे.

मुंबई - नारायण राणेंवर कुठला अग्रलेख लिहिलाय? नारायण राणेंसारखा डरपोक आणि पळपुटे आम्ही नाही. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणाऱ्यांपैकी नाही. कोणाला हिंमतीच्या आणि धाडसाच्या गोष्टी बोलता. मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललो नाही. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. धमक्या देऊ नका. धमक्या जर देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंना इशारा दिला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, माझ्या नादाला लागू नका, राजवस्त्र बाजूला काढा आणि या मग मी दाखवतो. झाकली मूठ सव्वालाखाची. हे काय मला जेलमध्ये पाठवणार, मी हिंमतीने माझ्या पक्षासाठी जेलमध्ये गेलोय. तुमच्यासारखा पळून गेलो नाही. ईडीने बोलवल्यावर शरणागती पत्करली नाही. नामर्द नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत मला जेलमध्ये घाला, तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? तुम्ही कायद्याचे बाप झालात का? या सर्वांची माझ्याकडे नोंद आहे. ते सगळं चीफ जस्टीस ऑफ इंडियाला पाठवली आहे. इकडच्या प्रत्येकाचं वक्तव्य़ आम्ही पाठवत आहोत. नारायण राणेंची सगळी आर्थिक प्रकरणं काढली तर ते ५० वर्ष सुटणार नाहीत असा इशाराही संजय राऊत यांनी नारायण राणेंना दिला आहे. 

नारायण राणे, माझ्या नादी लागू नकोनारायण राणे हा पादरापावटा आहे. आतापर्यंत मी त्याच्याबद्दल काही बोललो नाही. सगळ्यांना अरे तुरे करतो तू कोण आहे? याची चौकशी करा. कालपर्यंत मी संयमाने वागलो आता यांची प्रकरणं बाहेर काढतो. मोदींना अरे तुरे बोलत होते. डरपोक लोक आहेत. तुम्ही पळून गेला. किरीट सोमय्यांनी जे आरोप केले त्यावर उत्तर दिले का? नारायण राणे, माझ्या मागे लागू नकोस. तुझ्यासारखे ५६ आले आणि गेले. मर्यादेत राहायचं. नामर्द माणूस आहे. ईडी, सीबीआयच्या भीतीने तू पळून गेलास तुझी लायकी आहे का अशा शब्दात संजय राऊतांनी नारायण राणेंवर प्रहार केला आहे. 

त्याचसोबत नारायण राणे वेड्यांच्या कळपात आहे. त्याची सटकली आहे. त्याला वेड लागलंय. मी त्याला कालपर्यंत आदराने बोलत होतो. त्याच्यावर एकही शब्द बोललो नाही. शिंदे गटातील माणसाला केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी नारायण राणेंचे मंत्रिपद जातंय. त्यामुळे तो भैसाटला आहे. अजित पवारांनी समर्थक उपमा दिली. त्यांची बुद्धी टिल्लीच आहे. हा प्रश्न शरिरयष्टीचा नसून टिल्ल्या बुद्धीचा आहे. यापुढे जर तो बोलत राहिला तर मी त्याला पूर्ण नागडा करेन. तू ये नाहीतर तुझी पोरं येऊदे. ये मैदानात. केंद्राची सुरक्षा घेऊन फिरतोय. स्वत:ला मोठा भाई समजतो असंही संजय राऊत म्हणाले. 

'त्या' पदाधिकाऱ्यांची नावेही माहिती नाहीतजे येडेगबाळे पकडतात, पदाधिकारी म्हणून पक्षप्रवेश करून घेतात. नाशिकमधील शिवसेना जशीच्या तशी आहे. २-४ दलाल ठेकेदार तिकडे गेले असतील. जमिनीवरचा शिवसैनिक आणि शिवसेना जागेवरच आहेत. जे कुणी गेलेत त्यांची नावेही नाशिककरांना माहिती नाहीत. मला माहिती नाहीत अशा शब्दात संजय राऊतांनी ५० पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली. 

संपूर्ण देशाचं पोट मुंबई भरतेययोगी आदित्यनाथ यांच्याविषयी आम्हाला प्रेम, आदर, ते संत गृहस्थ आहेत. राजकारण बाजूला ठेवा. मुंबईत येऊन ते त्यांच्या राज्यासाठी विकासाची गंगा घेऊन जात असतील तर त्याचे आम्ही स्वागत करतो. चिंताग्रस्त होण्याचं कारण नाही. संपूर्ण देशाचं पोट मुंबई भरतेय. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा असेल या राज्यातील जनता इथं राहतेय त्यांना आम्ही प्रेमानं सांभाळतोय असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarayan Raneनारायण राणे Shiv Senaशिवसेना