शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांची भीती नसते, त्यांना कुठेही लघुशंका करण्याची...; संजय राऊतांची राज ठाकरेंवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 14:13 IST

सभा घ्यायला कुणाला बंदी आहे का? आम्ही रोज शिवतीर्थावर त्यांच्या घरासमोर सभा घेतो असं राऊत म्हणाले.

नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जानेवारी महिन्याच्या अखेरीस मुंबईत सभा घेणार असल्याचं समोर आले आहे. शिवसेना भवनासमोर ही सभा होईल असं बोललं जात आहे. मात्र त्यावरून आता शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. राज ठाकरे हे भाजपा पुरस्कृत आहेत असाही टोला राऊतांनी राज यांना लगावला आहे. 

संजय राऊत यांनी म्हटलं की, शिवसेना भवनाविषयी सगळ्यांनाच प्रेम आहे. सगळ्यांचा आत्मा तिथे अडकला आहे. सभा घ्यायची असेल तर घेऊ द्या. सभा घ्यायला कुणाला बंदी आहे का? आम्ही रोज शिवतीर्थावर त्यांच्या घरासमोर सभा घेतो. सभेला महापालिकेने परवानगी दिली तर घेऊ द्या. आणि सरकार त्यांचे आहे म्हटल्यावर परवानगी देणारच आहे. तेसुद्धा भाजपा पुरस्कृत आहेत असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत सभा घेण्यासाठी परवानगी आम्हाला मिळत नाही. आम्हाला संघर्ष करावा लागतो. कारण आमची भीती आहे. ज्यांची भीती सत्ताधाऱ्यांना नसते त्यांना कुठेही लघुशंका करण्याची परवानगी मिळते अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. 

नारायण राणे डरपोक, त्याला घाबरण्याचं कारण नाहीतुम्ही तुमचे काम करा. ज्या पक्षात  गेला तिथे ईमान राखा. आमच्यावर घाणेरडे आरोप करणे हे तुमचे काम नाही. पण बाडगा असतो तो जास्त मोठ्याने बांग देतो. तुम्ही आमच्याविरोधात उभे राहिले तेव्हाही आम्ही संयम राखला. उद्धवजींनी सांगितले संयम बाळगा. तुम्ही आता मर्यादा सोडलेत त्यामुळे आम्हाला हात जोडलेले आता सोडावे लागलेत. अजून हात सुटलेले नाहीत. तुम्ही आमची काय उखाडणार? तू लाचार माणूस, डरपोक. १० पक्ष बदलतो. डरपोकांना घाबरण्याचं कारण आम्हाला नाही अशा शब्दात संजय राऊतांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला. 

त्याचसोबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले सगळे तुरुंगात जाणार आहेत. अनेकांची प्रकरणे बाहेर आलीत. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा खासदार होणार नाही. डिपॉझिट जप्त होईल. त्याला शिंदे गट असो वा भाजपा कुणीही उमेदवारी दिली नाही. जे लोक आम्हाला सोडून गेलेत ते यापुढे लोकसभेत, विधानसभेत किंवा महापालिकेतही दिसणार नाहीत हे लिहून घ्या असंही राऊतांनी म्हटलं.   

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरेNarayan Raneनारायण राणे