शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Gajanan Kirtikar: नाव ठाकरे सरकारचं, पण खरा फायदा घेतंय 'पवार सरकार'; शिवसेना खासदाराचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 21:04 IST

"याला ठाकरे सरकार म्हटले जाते, पण खरा फायदा तर पवार सरकारलाच मिळत आहे..."

महाराष्ट्रात भलेही उद्धव ठाकरे सरकारचे नाव आहे, पण खरा फायदा 'पवार सरकार'लाच होत आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले आहे. रत्नागिरीत बोलताना, आघाडी सरकारमधील भागीदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत कीर्तिकर म्हणाले, याला ठाकरे सरकार म्हटले जाते, पण खरा फायदा तर पवार सरकारलाच मिळत आहे.

एक प्रश्नाला उत्तर देत कीर्तिकर म्हणाले, 'माझी रत्नागिरीतून कुठलीही निवडणूक लढण्याची इच्छा नाही. मुंबईमध्ये आम्हाला सीएम आणि नगर विकास फंडातून भरपूर निधी मिळतो. ग्रामीण भागांतील लोकप्रतिनिधींना गावांत बरीच कामे करावी लागतात. मी माझ्याकडून शक्य तेवढी मदत करत असतो.'

कीर्तीकर म्हणाले, सरकारकडून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. मी येथे राष्ट्रवादीचे नाव घेईन. या सरकारला आपण उद्धव ठाकरे सरकार म्हणून ओळखतो, पण खरा फायदा पवार सरकारला होत आहे. यामुळे सरकारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. रत्नागिरीतील दापोली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात कीर्तिकर बोलत होते. यावेळी, आमदार योगेश कदम आणि शिवसेनेचे इतर स्थानीय नेतेही उपस्थित होते. 

खरे तर, राज्यातील महाविकास अघाडी सरकारमध्ये सहभागी असलेले काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते नेहमीच विकासासाठी कम फंड मिळत  असल्याची तक्रार करत असतात. एवढेच नाही, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. या आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष सहभागी आहेत, मात्र खरा फायदा राष्ट्रवादीलाच होत आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांपेक्षा त्यांच्या नेत्यांना अधिक निधी दिला जातो, असे फडणवीस यांनी म्हटले होते.

टॅग्स :Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकरShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस