शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

'मातोश्री'वरून आदेश येईपर्यंत शिवसेना आमदार झोपलेले असतात का? राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 14:10 IST

अंगणवाडी सेविकांवरील मेस्माच्या प्रश्नावरून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्य सरकार आणि शिवसेनेवर घणाघाती टीका केली.

मुंबई - अंगणवाडी सेविकांवरील मेस्माच्या प्रश्नावरून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्य सरकार आणि शिवसेनेवर घणाघाती टीका केली. विरोधक मतदानाची मागणी करणार असल्यानेच सरकारकडून अंगणवाडी सेविकांवरील मेस्माला स्थगिती देण्यात आली. तसेच या प्रश्नी 'मातोश्री'वरून आदेश येईस्तोवर शिवसेनेचे आमदार झोपलेले होते का, असा चिमटाही विखे पाटील यांनी काढला.

याबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विखे-पाटील म्हणाले, "अंगणवाडी सेविकांवरील 'मेस्मा'स्थगित करण्यासंदर्भात विधानसभेत बहुमत असतानाही सरकार या संदर्भातील निर्णय स्थगित करायला तयार नसल्याने विरोधी पक्षांनी सभागृहात मतदान मागण्याची रणनिती आखली होती. मतदान झाले तर सरकार धोक्यात येईल, या भीतीपोटी अखेर अंगणवाडी सेविकांवरील 'मेस्मा'स्थगित करण्यात आला."  

सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, अंगणवाडी सेविकांना 'मेस्मा' कायदा लागू करण्याचा निर्णय स्थगित करण्यासंदर्भात आम्ही गेल्या सोमवारीच स्थगन प्रस्ताव दिला होता. त्यावेळी मात्र शिवसेना गप्प होती. त्यानंतर अचानक'मातोश्री'वरून आदेश आल्यानंतर शिवसेनेने विधानसभेत गोंधळ घातला.'मातोश्री'वरून आदेश येईस्तोवर शिवसेनेचे आमदार झोपलेले होते. उशिरा का होईना शिवसेनेलाही या मुद्यावर जाग आल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गुरूवारी या निर्णयासंदर्भात मतदान मागण्याची रणनिती आखली होती. त्याची कुणकूण लागल्यामुळेच सरतेशेवटी सरकारवर दबाव निर्माण झाला व सरकारने हा निर्णय स्थगित करण्याची घोषणा केली, असे विखे पाटील म्हणाले.

दरम्यान, बुधवारी विधानसभेत बोलताना महिला व बालविकास मंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामुळे १२५ बालकांचा मृत्यू झाल्याचे विधान केले होते. अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू असताना झालेल्या बालमृत्युंची जबाबदारी अंगणवाडी सेविकांची असेल तर त्या सेवेत कार्यरत असताना सरकारच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या बालमृत्युंची जबाबदारी सरकार स्वीकारणार आहे का? असा प्रश्न विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. मंत्र्यांनी केलेले हे विधान चुकीचे असल्याने ते कामकाजातून वगळण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv Senaशिवसेना