शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त पैठणमधील आमदार पुत्राचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 19:02 IST

पैठण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने, गुरवारी असलेला आपला वाढदिवस साजरा न करण्याच्या निर्णय विलास भुमरे यांनी घेतला होता.

मोसिन शेख 

मुंबई - पैठण तालुक्याचे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांचे पुत्र आणि औरंगाबाद जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे यांचा आजचा वाढदिवस चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. पैठण तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने सुरुवातीला त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे निर्णय घेतला होता, परंतु हा निर्णय एका रात्रीत बासनात गुंडाळून विलास भुमरे यांनी धूमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. 

पैठण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने, गुरुवारी असलेला आपला वाढदिवस साजरा न करण्याच्या निर्णय विलास भुमरे यांनी घेतला होता. एवढच नाही तर, पुष्पहार, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ तसेच कुठल्याही भेट वस्तू आणू नयेत, असे आवाहन त्यांनी केले होते.वाढदिवस साजरा करण्याच्या मोह प्रत्येकालाच असतो. त्यात मग आमदार पुत्र आणि जिल्ह्याच्या दोन खात्याचे सभापती असल्यावर वाढदिवस  कसा साजरा होणार नाही. त्यामुळेच की काय, दुष्काळामुळे वाढदिवस साजरा न करण्याच्या निर्णय घेतलेल्या विलास भूमरेंना सुद्धा मोह आवरता आला नसावा आणि त्यांनी  जिल्हा परिषदमध्ये असलेल्या आपल्या  कार्यलयात धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे पुष्पगुच्छ,पुष्पहार आणि शाल पण त्यांनी स्वीकारल्या.

दुष्काळ असल्याने वाढदिवस साजरे न करण्याचे निर्णय आजपर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी घेतले आहेत. मात्र वाढदिवस साजरा न करण्याचे निर्णय घेऊन धुमधडाक्यात वाढदिवस साजरे करणारे विलास भुमरे हे पहिलेच नेते असावे.

विलास भुमरे म्हणतात वाढदिवस साजरा न करता गोर-गरीब ३ हजार विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप करण्याचे नियोजन मी केले आहे. तसेच कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याचा आवाहन सुद्धा केले होते. परंतु कार्यकर्त्यांचे असलेले प्रेम, त्यामुळे ते शुभेच्छा देण्यासाठी आलेच. जनतेच्या प्रेमापोटी मला ती पुष्पगुच्छ स्वीकारावी लागले आणि वाढदिवस साजरा झाला.