शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
2
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
3
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
4
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
5
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
6
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
7
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
8
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
9
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
10
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
11
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
12
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
13
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
14
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
15
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
16
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
17
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
18
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
19
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
20
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर

'दहावा, तेराव्याला असे अनेक कावळे फिरतात, ', शरद पवारांबद्दल शिवसेना आमदार शिंदेंचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 13:01 IST

Sharad Pawar News : शरद पवार यांच्या सातारा जिल्ह्यातील दौऱ्याबद्दल बोलताना आमदार महेश शिंदे यांचा तोल सुटला. शरद पवार यांना कावळा म्हणत त्यांनी टीका केली. 

Maharashtra politics : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून, पक्षाची बांधणी आणि उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी शरद पवार राज्यात फिरताना दिसत आहेत. शरद पवारांनी सातारा जिल्ह्यातही लक्ष्य घातल्याचे दिसत असून, त्यांच्या जिल्ह्यातील वाढत्या दौऱ्याबद्दल बोलताना शिवसेनाआमदार महेश बालदी पवारांना कावळा म्हणाले. 

विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकारण तापू लागले आहे. नेत्यांचे दौरे वाढले असून, आमदार आणि इच्छुकांनीही आपापल्या मतदारसंघांवर लक्ष्य केंद्रीत केल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही राज्यात फिरताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यातील त्यांच्या वाढत्या दौऱ्यांवर शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी टीका केली. 

आमदार शिंदे शरद पवारांना म्हणाले कावळा शरद पवारांच्या सातारा आणि कोरेगाव मतदारसंघातील दौऱ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी पवारांचे नाव न घेता निशाणा साधला. "दहावा आणि तेराव्याच्या कार्यक्रमांना असे अनेक कावळे फिरत असतात. त्याने काही फरक पडत नाही. ते फक्त प्रसाद उचलतात अन् निघून जातात", असे विधान आमदार शिंदेंनी केले. 

शरद पवारांवरील टोकाच्या टीकेचा अजित पवारांना बसला झटका

लोकसभा निवडणुकीत भाजपकडून शरद पवारांना लक्ष्य केले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर भटकती आत्मा अशी टीका केली. तर चंद्रकांत पाटील यांनीही शरद पवारांबद्दल विधान केले होते. त्याचा फटका बारामती लोकसभा निवडणुकीत बसल्याबद्दलची नाराजी अजित पवारांनी जाहीरपणे बोलून दाखवली होती. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाMLAआमदारkoregaon-acकोरेगावNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण