शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजपाची काय औकात होती?; शिवसेनेचा तिखट शब्दात पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 17:28 IST

खासदार अनिल बोंडे यांनी जी टीका केली तसं बोलणे उचित नाही. सत्ताधारी पक्षाच्या माणसाने, राज्यसभा सदस्य आणि माजी कृषी मंत्र्यांनी बेजबाबदारपणे बोलू नये असा इशारा शिवसेना नेत्यांनी दिला.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी शिवसेना-भाजपा यांच्यात बिनसल्याची चर्चा होती. त्यात शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती असल्याची जाहिरात सर्वच प्रमुख वृत्तांमध्ये छापण्यात आली. या जाहिरातीनंतर भाजपा नेते नाराज झाले. त्यानंतर पुन्हा सारवासारव करत शिवसेनेकडून दुसरी जाहिरात देण्यात आली. परंतु या जाहिरातबाजीवरून शिवसेना-भाजपा यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांवर शिवसेना नेत्यांनी पलटवार केला आहे. 

शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ५० वाघ आहेत आणि यांच्यामुळेच भाजपाच्या मंत्र्यांना सत्तेत स्थान आहे. एखाद्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची काम करण्याची पद्धत जनतेला पसंत असेल तर त्याची वाहवाह करू शकते. ते पचवण्याची ताकद राजकीय नेत्यांनी ठेवायला पाहिजे. एकनाथ शिंदेंना बेडकाची उपमा देणे, ठाण्यापुरती मर्यादित ठेवणे हे बोलण्याआधी तुम्ही किती मर्यादित होते, कोणाच्या बळावर तुम्ही मोठे झाले. बाळासाहेब ठाकरेंचे बोट पकडून तुम्ही मोठे झाले, नाहीतर तुमची काय औकात होती? असा घणाघात त्यांनी केला. तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेबद्दल बोलताना आणि त्यांच्या नेत्यांबद्दल विधान करताना खासदार अनिल बोंडे यांनी आत्मचिंतन करून बोलायला पाहिजे असंही गायकवाड यांनी म्हटलं. 

तर खासदार अनिल बोंडे यांनी जी टीका केली तसं बोलणे उचित नाही. सत्ताधारी पक्षाच्या माणसाने, राज्यसभा सदस्य आणि माजी कृषी मंत्र्यांनी बेजबाबदारपणे बोलू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख आहेत. आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते लोकप्रिय आहेत त्यांच्याबाबत शंका कुशंका करण्याची गरज नाही. आमच्या नेत्यांबद्दल जर कुणी अशाप्रकारे बोलले तर ते आम्ही सहन करणार नाही असा इशारा मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला. 

काय म्हणाले होते अनिल बोंडे?एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांना भाजपाने, जनतेने स्वीकारले आहे. ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही. शिंदेंना त्यांचे सल्लागार चुकीचे सल्ले देत असतील. उद्धव ठाकरेंना मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटत होता. आता शिंदेंना वाटायला लागलं आहे, असे बोंडे म्हणाले. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही, अशा शब्दांत बोंडे यांनी शिंदेंना टोला लगावला आहे

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाSanjay Gaikwadसंजय गायकवाडAbdul Sattarअब्दुल सत्तार