शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

"सूरत, गुवाहाटी दौऱ्यामुळे गुलाबरावांना स्मृतिभ्रंश; गद्दारांनी राजीनामे देऊन दाखवावे!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 15:30 IST

संपर्कप्रमुख संजय सावंत हे आपल्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

जळगाव - प्रत्येक शिवसैनिकासाठी शाखा म्हणजे मंदिर असते. यामुळे त्या मंदिरात जाण्यात काहीही गैर नाही. कारण ज्यांना पक्षाबाबतची निष्ठा असते, तेच या मंदिरात जातात व ज्यांना पैसे व ठेक्यांचे आमिष असते तेच गद्दारी करतात, अशा शब्दात शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शाखा म्हणजे शिवसेनेचा आत्मा असून, याठिकाणी आम्हाला जाण्यात काहीही गैर वाटत नसल्याचेही  सावंत यांनी सांगितले. संपर्कप्रमुख संजय सावंत हे आपल्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, युवा सेनेचे विभागीय सचिव विराज कावडीया, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सुनील ठाकूर, जाकीर पठाण यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 शिवसेनेचे आमदार आमच्यासाठी गद्दार असून, त्यांनी आधी राजीनामे द्यावेत. मग दिसून जाईल की जनता कोणासोबत आहे? असे आव्हान सावंत यांनी दिले. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी पक्ष सोडताना आधी आमदारकीचा राजीनामा दिला होता, तशी हिंमत गद्दार आमदारांनी दाखवावी, असे आव्हानही सावंत यांनी दिले. 

सुरत, गुवाहाटी दौऱ्यामुळे गुलाबरावांचा स्मृतिभ्रंशगुलाबराव पाटलांनी मला शिवसेनेसाठी काय काम केले? हे विचारु नये. जळगावसह विदर्भातील तापमानाचाही आम्हाला अंदाज आहे. गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्रीपद असतानाही त्यांच्या मतदारसंघाव्यतिरिक्त पक्षासाठी काय काम केले? असाही प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. एक-दीड महिन्यापूर्वी माझी स्तुती करणाऱ्या गुलाबराव पाटलांना अवघ्या महिनाभरात नेमके काय झाले? सुरत, गुवाहाटी, गोव्याच्या दौऱ्यामुळे गुलाबराव पाटील यांचा स्मृतिभ्रंश झाला आहे का? असाही प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला.

विकासासाठी अडथळा आणल्यास जळगावकर मातीत गाडतील - जळगाव शहराच्या विकासासाठी १२० कोटींचा निधी दिला असल्याचे सांगत गुलाबराव पाटील एकप्रकारे मनपातील पदाधिकाऱ्यांना धमकीच देत आहेत. मात्र, जळगाव शहरातील विकासकामांमध्ये अडथळा निर्माण केल्यास जळगावकर त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाहीत, अशा संतप्त शब्दात सावंत यांनी उत्तर दिले आहे. ज्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आधीच पक्ष सोडला होता, त्यांनीच पुन्हा प्रवेश केला. त्यामुळे ६० जणांचा हा प्रवेश म्हणजे भूकंप नसून, तो फुसका बारच अधिक असल्याचे सावंत म्हणाले. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, हे गुलाबरावांचा चेहरा पाहूनच समजून जाते, असेही सावंत म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाGulabrao Patilगुलाबराव पाटील