शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेची भांग प्यायलेली लोकं काहीही करू शकतात, संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 10:27 IST

लढाई चिन्हाची असेल, पक्षाची असेल कोणतीही असेल तरीही आम्ही त्याच्याशी दोन हात करण्यास समर्थ आहोत - राऊत

शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. सामना प्रबोधन ट्रस्टची संपत्ती आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जी व्यवस्था केली आहे, त्यानुसार हे चालतं. त्यांना महाराष्ट्र तोडायचाय म्हणून शिवसेना तोडायची आहे. उद्या म्हणतील मातोश्रीत जातो, त्यांचा काही भरवसा नाही. नशेची, सत्तेची भांग प्यायलेली लोकं काहीही करू शकतात. उद्या मातोश्री आमचं आहे म्हणत कब्जाही करू शकतात. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापनच केली नाही असंही ते म्हणू शकतात. अशी यांची वैचारिक पातळी उंचावली आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या भविष्याचा निर्णय घेणारी सुनावणी सुरू होणार आहे. त्याच अस्वस्थतेतून मुख्यमंत्र्यांच्या भेटी सुरू आहेत. न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, तरी रामशास्त्री बाण्याचे काही न्यायमूर्ती आहेत. त्यांच्याकडून राष्ट्रसेवाच घडेल, याची खात्री शिवसेनेला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

“५० आमदारांच्या घरावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलाच होता आता खासदारांच्या घरावरी होतोय. पोलीस बळाचा वापर केला जात आहे, पैशाचा वापर आणि ब्लॅकमेलिंगही केलं जात आहे. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करायला सामना करायला बाळासाहेबांची शिवसेना तयार आहे. मुख्यमंत्री दिल्लीत आले असतील तर तो त्यांचा नियमित दौरा आहे. ते भाजपचे मुख्यमत्री आहेत. त्यांचं हायकमांड येथे आहे. मंत्रिमळ तयार करायचं आहे, नावं अंतिम करायची आहे, तर यावं लागेल. मी शिवसेनेचे दोन मुख्यमंत्री पाहिले आहेत, ते कधी मंत्रिमंडळाची यादी घेऊन किंवा सरकार स्थापनेसाठी दिल्लीत आले होते हे माहित नाही. त्या काळी सर्व चर्चा मुंबईत होत होती. ते कोणते प्रश्न घेऊन येथे आले असतील तर टीका करणार नाही,” असं संजय राऊत म्हणाले. दोन हात करण्यासाठी समर्थ“लढाई चिन्हाची असेल, पक्षाची असेल कोणतीही असेल तरीही आम्ही त्याच्याशी दोन हात करण्यास समर्थ आहोत. ज्या पद्धतीनं छुपे वार सुरू आहेत, महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते भाजपते लोक जाहीररित्या बोलत आहेत. ते तीन तुकडे करण्यासाठी शिवसेनेचे तुकडे करू इच्छित आहेत. अखंड शिवसेना फोडा, ताकद कमी करा. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार खासदार पाठित खंजीर खुपसून जात असतील तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. केवळ आमदार आणि खासदार शिवसेनेची ताकद नाही. यातूनही शिवसेना पुन्हा उभी राहिल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. ज्यांच्या घराबाहेर पहारे लागलेत त्यांना कोणत्याही सभागृहात येणं कठिण करून असा इशाराही त्यांनी दिला. संजय जाधव यांच्याबद्दलच्या बातम्या येत असून ते त्यामुळे अस्वस्थ असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे