शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

... तर चंद्रकांत पाटलांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील, संजय राऊतांचा टोला

By जयदीप दाभोळकर | Updated: January 2, 2021 11:57 IST

सामनातील संपादकीय विषयी रश्मी ठाकरेंना पत्र लिहिणार असल्याचं म्हणाले होते चंद्रकांत पाटील

ठळक मुद्देसामनाच्या अग्रलेखातील भाषेविषयी रश्मी ठाकरेंना पत्र लिहिणार असल्याचं पाटील म्हणाले होते. औरंगाबादच्या नामांतरवरून महाविकास आघाडीत मतभेद नसल्याचं राऊतांचं वक्तव्य

काही दिवसांपूर्वी सामनाच्या संपादकीयमधून भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. दरम्यान, सामनाच्या संपादकीयमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवरून आपण सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली. यानंतर यानंतर शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी निशाणा साधला. जर चंद्रकांत पाटील हे सामना वाचत राहतील तर त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतील असं म्हणत राऊत यांनी त्यांना टोला लगावला."चंद्रकांत पाटील कालपर्यंत सामना वाचत नव्हते. आज ते वाचायला लागले हिच मोठी बाब आहे. जर ते सामना वाचत राहतील तर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होती. सकारात्मक दृष्टीकोनातून ते महाराष्ट्र आणि देशाकडे पाहतील. सामना वाचत राहतील तर त्यांना महाराष्ट्रातील सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वासही त्यांना येईल," असं राऊत म्हणाले.यावेळी राऊत यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराच्या विषयावरही भाष्य केलं. "महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत. बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण किंवा अन्य कोणी महाराष्ट्रातील नेते आहेत त्यांचं औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी राजे यांच्यावरच त्यांचं प्रेम आणि श्रद्धा आहे. प्रत्येक व्यक्तीची, हिंदूंची छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असायला हवी. जसा बाबर आमचा कोणी लागत नाही तसा औरंगजेबही लागत नाही. दिल्लीतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राम मंदिर उभारण्याची परवानगी दिली आहे. कारण या भूमीचं जसं बाबरशी नातं नाही तसंच औरंगजेबाशीही नाही," असंही त्यांनी नमूद केलं.काय म्हणाले होते पाटील?"मी संभाजीनगरला काही प्रवासानिमित्त गेलो होतो. त्यावेळी मी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे असं म्हटलं होतं. त्यावेळी सामनानं माझ्यावर अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता. या विषयी मी रश्मी ठाकरे यांना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात. याचा अर्थ अग्रलेख हा तुमच्या नावानं लागतो," असं पाटील म्हणाले होते. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली ती भाषा रश्मी ठाकरे या संपादका असलेलं संपादकीय असूच शकत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद