शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
2
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
3
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
4
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
5
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
6
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
7
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
8
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
9
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
10
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
12
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
13
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
14
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
15
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
16
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
17
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
18
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
19
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
20
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या

Sanjay Raut in ED Custody: संजय राऊतांचा मुक्काम चार दिवस ईडी कोठडीत; आठ दिवसांचा ताबा कोर्टाने नाकारला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 08:22 IST

पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा; ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत. शिवसैनिकांकडून राज्यभर निषेध.

मुंबई : शिवसेना नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी विशेष पीएमएलए न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. वास्तविक, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राऊत यांना आठ दिवसांची कोठडी सुनावण्याची विनंती न्यायालयाला केली होती. मात्र, याआधी प्रवीण राऊतप्रकरणी सर्व कागदपत्रे हाती असताना  संजय राऊत यांची आठ दिवस कोठडी कशाला? असा प्रश्न करत न्यायालयाने राऊत यांना केवळ चारच दिवसांची ईडी कोठडी सुनावली. 

पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहारप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा अटक केली. घोटाळ्यातील काही रक्कम संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांनी राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात जमा केल्याचा ईडीने आरोप केला आहे. एप्रिल महिन्यात ईडीने वर्षा राऊत व त्यांच्या दोन सहकाऱ्यांची सव्वाअकरा कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खा. संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मी आणि शिवसेना तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, असे त्यांनी राऊत कुटुंबाला सांगितले. केंद्र सरकार आणि ईडी कारवायांविरोधात शिवसैनिकांनी सोमवारी रस्त्यावर उतरत राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले.  

ईडीचा दावा : पुराव्यांसोबत छेडछाड राऊत यांना चौकशीसाठी तीनदा समन्स बजावण्यात आले. मात्र, चौकशीसाठी ते एकदाच हजर राहिले, असा आरोप ईडीने संजय राऊत यांच्यावर केला. त्यांनी महत्त्वाच्या पुराव्यांसोबत छेडछाड केल्याचेही ईडीने म्हटले. तसेच राऊत तपासात सहकार्य करत नसल्याचेही ईडीने नमूद केले.

राऊतांतर्फे युक्तिवाद : सूडापोटी कारवाई

  • ईडीने केलेले सर्व आरोप संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी फेटाळून लावले. 
  • ईडीने रिमांड अर्जात केलेले सर्व आरोप स्पष्ट नाहीत. त्यांच्यावर राजकीय सूडापोटी कारवाई करण्यात आली आहे. 
  • आर्थिक गुन्हे शाखेने २०२०मध्ये पत्राचाळ अनियमिततेबद्दल तपास करण्यास सुरुवात केली. मात्र, प्रवीण राऊत यांच्यावर गेल्या वर्षी ईसीआयआर नोंदविण्यात आला आणि जानेवारी २०२२मध्ये त्यांना अटक झाली. संजय राऊत यांना अटक करण्यात आली नव्हती. 
  • वर्षा राऊत यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. आर्थिक गैरव्यवहार करायचा होता, तर पैसे थेट वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले असते का?
  • कायदेशीर मार्गानेच पैसे मिळाले आहेत आणि वर्षा राऊत यांनी केलेला सर्व व्यवहार कायदेशीरच आहे. 

घरचे अन्न घेण्याची मुभासंजय राऊत यांना घरचे अन्न व औषधे देण्याची परवानगी दिली. तसेच त्यांना सकाळी ८:३० ते ९:३० पर्यंत वकिलांना भेटण्याची परवानगीही देण्यात आली. 

राऊत कुटुंबीय लाभार्थीसंजय राऊत यांना न्यायालयात दुपारी २ वाजून ५४ मिनिटांनी हजर केले. ईडीने राऊत यांना आठ दिवस ईडी कोठडी सुनावण्याची विनंती केली. आर्थिक गैरव्यवहारातून राऊत कुटुंबीयांना १ कोटी सहा लाख रुपयांचा आर्थिक फायदा झाला. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या ५५ लाख रुपयांतून दादरला फ्लॅट खरेदी करण्यात आला आणि काही रकमेतून अलिबाग येथे किहीम बीचजवळ वर्षा राऊत व स्वप्ना पाटकर यांच्या नावे जमीन खरेदी करण्यात आली. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे ‘फ्रण्ट मॅन’ आहेत. संजय राऊत व त्यांच्या कुटुंबीयांच्या देशाअंतर्गत व परदेशातील दौऱ्यांसाठी पैसे वापरले जात, अशी माहिती ईडीतर्फे ॲड. हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयात दिली. 

न्यायालयाचे निरीक्षण राऊत यांना ईडी कोठडी सुनावण्याची आवश्यकता असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. ११२ कोटींची अफरातफर केली आहे. त्यानंतर ही रक्कम आरोपीच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. त्यातील ५५ लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी करण्यात आला. काही विकासकांना बेकायदा एफएसआय विकण्यात आला. चौकशी व गुन्ह्याचे स्वरूप पाहता ईडी कोठडीची आवश्यकता आहे, असे ठामपणे वाटते, असेही न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय