शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

“शिवसैनिक आज आनंदी झाला असेल,” राऊतांवरील कारवाईवरून शिंदे गटातील आमदाराची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 10:10 IST

"शरद पवारांच्या नादी लागून यांनीच शिवसेनेचं वाटोळं केलं आहे," संजय राऊतांवर आमदाराचा हल्लाबोल.

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम संजय राऊत यांच्या घरी ईडीकडून झाडाझडती आणि चौकशी सुरू आहे. दरम्यान, शिंदे गटात सहभागी झालेले आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना अटक झाली तर शिवसैनिक खुशच होतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“ईडीची एवढीमोठी धाड पडते तेव्हा त्यांना अटक होण्याची शक्यता जास्त आहे. शिवसैनिक आज आनंदी झाला आहे. ज्यांच्यामुळे शिवसेना फुटली, महाराष्ट्राला त्रास झालाय, शिवसेनेचे ४० आमदार १२ खासदार गेले ते सर्व आज आनंदी आहेत, शिवसैनिक आनंदी आहेत. ते काही मास लीडर नाही, प्रवक्ते आहेत. त्यामुळे काही मोठा उठाव होईल असं वगैरे वाटत नाही,” असं शिरसाट म्हणाले.

“त्यांनी बाळासाहेबांची शपथ घेऊ नये. बाळासाहेबांची शपथ घेण्याइतके ते मोठे नाहीत. तो अधिकार आम्हाला आहे. आम्ही शिवसेनेत ४० वर्षे काढली. नोकरी करता करता नेते होण्याइतकं सोपं नाही. त्याची जाणीव आता त्यांना होईल,” असंही त्यांनी नमूद केलं.

'बाहेरचा रस्ता दाखवतील…'एक दिवस उद्धव ठाकरेच यांना बाहेरचा रस्ता दाखवतील तेव्हा यांना यांची जागा कळेल. शरद पवारांच्या नादी लागून यांनीच वाटोळं केलं आहे. त्यांनी प्रत्येक वेळी यांनीच अनेक कारणं दाखवून आपण राष्ट्रवादीसोबत कसं असायला पाहिजे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचंच हे कारण हे. सर्वजण फुटले त्याचं कारणचं संजय राऊत असल्याचं शिरसाट म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय