बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने राज्यात संतापाची लाट आहे. नुकतेच त्यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओदेखील समोर आले आहेत. यावरून संतोष देशमुख यांची कीती क्रूरपणे हत्या करण्यात आली, हे प्राथमिकदृष्ट्या दिसते. या प्रकरणातील सर्व आरोपी धनंजय मुंडे यांच्याशी संबंधीत असल्याचे आरोपही होत आहेत. हे प्रकरण आमदार सुरेश धस यांनी चांगलेच लाऊन धरले. यासंदर्भात शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी आज भाष्य केले. "सुरेश धस थंड का पडले? कुणी गळा दाबला आमच्या धसांचा? कुणी तरी गळा दाबलाय, कुणी तरी त्याच्या मानेवर बसलं आहे ना, पण तुमचे राजकीय आका जरी तुमच्या मानेवर बसले असले, तरी जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही." असे राऊत यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
यावेळी, एका प्रश्नाला उत्तर ददेताना राऊत म्हणाले, "यापुढेही धनंजय मुंडे यांना वाचवले जाईल. वाल्मिक कराडलाही वाचवले जाईल. ही एक मोठी साखळी आहे. वाल्मिक कराडला धनंजय मुंडे वाचवतील आणि धनंजय मुंडेंना त्यांचे सरकारमधील आका वाचवतील. हे आका-आका प्रकरण काय आहे. सुरेश धस थंड का पडले? कुणी गळा दाबला आमच्या धसांचा? कुणी तरी गळा दाबलाय, कुणी तरी त्याच्या मानेवर बसलं आहे ना, पण तुमचे राजकीय आका जरी तुमच्या मानेवर बसले असले, तरी जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही."
समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिसंदर्भात प्रश्न केला असता राऊत म्हणाले, "समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ अत्यंत गंभीर आणि अस्वस्थ करणारे आहेत." यावर, फडणवी तेव्हा असे म्हणाले होते की, अशी कुठली घटनाच घडली नाही. त्यांन चुकीचे ब्रिफिंग गेले असेल तर? असा प्रश्न केला असता राऊत म्हणाले, "बघा यासंदर्भात फडणवीस खोटे बोलत आहेत. त्यांना चुकीचे ब्रिफिंग झालेले नाही. हे सर्व फोटे आणि व्हिडिओ त्या क्षणी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवरांनीही बघितले आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही बघितले आहेत. तपास अधिकाऱ्यांनी ते समोर आणले आहेत. जर देवेंद्र फडणवीस तेव्हा म्हणाले असती की, असे काही घडले नाही, मी बघितले नाही, तर ते जनतेची दिशाभूल करत आहेत. हे फोट जर आमच्यापर्यंत आले, हे व्हिडिओ जर आमच्यापर्यंत आले, ते आरोप पत्रात लावले आहेत. तर राज्याचे गृहमंत्री हे कसकाय झटकू शकतात की, ते आमच्यापर्यंत आलं नाही, आम्ही पाहिलं नाही आणि असं काही घडलं नाही. धड-धडीत पुरावे असता गृहमंत्र्यांना जर माहीत नसेल, तर ते गृहमंत्री पदावर व्यवस्थित कम करण्याची त्यांची माणसिकता नाही."
राउत पुढे म्हणाले, "या राज्याचे मुख्यमंत्री हे रामशास्त्री नाहीत, हे आता लक्षात आले आहे. या राज्याचे मुख्यमंत्री कायदा आणि न्याय याची गूज राखत नाहीत. आपल्या लोकांच्या बाबतीत काही लोकांना ते वाचवण्याचा प्रयत्न करतात. याला न्याय म्हणत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना न्याय करायचा असेल, तर त्यांनी कलंकित मंत्र्यांना मंत्रींडळातून ताबडतोब बाहेरचा रस्ता दाखवायला हवा, जे भ्रष्टाचारी आहेत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा आणि या राज्यात राजकीयदृष्ट्या कायद्याचा गैरवापर इतर कुमी करू नये, हे सुद्धा बघायला हवे. आज पोलीस यंत्रणांचा गैर वापर होत आहे. कायद्याचा गैरवापर होत आहे आणि या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस आहेत. या बाबत त्यांच्या मनाला ही टोचणी लागायला हवी."