शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सोमय्यांच्या मदतीनं रामदास कदमांनी केला अनिल परबांचा गेम?; वाचा फोनवर झालेलं संभाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 19:16 IST

अनिल परबांविरुद्धचे पुरावे रामदास कदम यांनी सोमय्यांना दिल्याचा आरोप; मनसेनं दिल्या ऑडिओ क्लिप

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांनी गेल्या काही महिन्यांत शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सातत्यानं आरोप करून सोमय्यांनी त्यांना वारंवार अडचणीत आलं आहे. परब यांच्यावर तुटून पडलेल्या सोमय्यांना शिवसेनेच्याच बड्या नेत्याने रसद पुरवल्याचा आरोप आता राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. याशिवाय मनसेच्या नेत्यानं सोमय्या आणि कदम यांच्या ऑडिओ क्लिपदेखील समोर आणल्या आहेत.

प्रसाद कर्वे नावाचा एक माहिती अधिकार कार्यकर्ता परब यांच्याविरोधात किरीट सोमय्यांना सगळी माहिती पुरवतो, कारवाईसाठी पाठपुरावा करतो आणि मग हाच कार्यकर्ता सगळ्या अपडेट्स शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना पुरवतो, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे. संजय कदम यांचे आरोप रामदास कदम यांनी फेटाळले आहेत.

ऑडिओ क्लिपमधील संभाषण जसंच्या तसं-रामदास कदम- हॅलो..प्रसाद कर्वे- आज पोलीस गुन्हा दाखल केला किरीट सोमय्यांनी..कदम- क्या बात है.. वाह...कर्वे- पहिल्या तक्रारीमध्ये सदा अप्पाचं नाव नव्हतं. मग मी तक्रार बदलली. त्यांना बदलायला सांगितली. मी त्यांना सांगितलं, यात सदा अप्पाचं नाव टाका. कारण याचा कर्ताकरविता हाच आहे.कदम- अच्छा अच्छा..कर्वे- त्यामुळे सदाचं नाव त्या पोलीस तक्रारीमध्ये टाकलं.कदम- ओके ओके..कर्वे- दिल्लीची टीम आलेली आहे.. कदम- कधी आली..?कर्वे- आली सीआरझेडची..कदम- कधी आली..कर्वे- आजच आली.. आता ते दाखवायला गेलेत खाली..कदम- मेला मग हा.. मेला मेला..कर्वे- हा हा..कदम- वाट लागली वाट लागली.. दिल्लीची टीम आली आणि त्यांनी झाडं कापलेली, रस्ता बनवलेला बघितला ना.. मेला मग हा...कर्वे- हो..कदम- आणि १०० टक्के सीआरझेडच्या खाली येतंय ते..कर्वे- होय.. १०० टक्के सीआरझेडमध्ये येतं..ती ऑडिओ क्लिप खोटी; अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार- कदममनसेच्या वैभव खेडेकरांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. त्यात कोणतंही तथ्य नाही, असं म्हणत कदमांनी आरोप फेटाळून लावले. माझ्या मुलाविरुद्ध विधानसभा निवडणुकीत संजय कदम पराभूत झाले. तेव्हापासून ते सातत्यानं माझ्यावर आरोप करत आहेत. वैभव खेडेकरांच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली. त्यामुळे माझी बदनामी करण्यासाठी ते असे आरोप करतात. मी आधीच त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे आणि आता पुन्हा मानहानीचा दावा करणार आहे, असं कदम म्हणाले.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमKirit Somaiyaकिरीट सोमय्याAnil Parabअनिल परब