शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'ती' जखम राज ठाकरेंच्या मनाला वेदना देणारी; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 13:26 IST

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समाचार घेतला.

सोलापूर - आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागलेत. त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईत पक्षाच्या गटाध्यक्षांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज यांनी राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवरही घणाघात केला. राज ठाकरेंनीउद्धव ठाकरेंची नक्कल केली. त्यावरून शिवसेना नेत्यांनी आता राज ठाकरेंवर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. त्यात शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. 

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांनी तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ती जखम आजही राज ठाकरेंच्या मनाला वेदना देत आहे. त्यामुळे ते बेताल पद्धतीने टीका करतात. जे व्यंग नाहीत त्याला शोधून आणायचे आणि मिमिक्री करायची याला दूषित दृष्टी म्हणतात किंवा सडलेली दृष्टी म्हणतात असा घणाघात त्यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समाचारमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फ्रिज खोकेबाबतची टीका निराधार आहे. परिस्थितीमुळे एकनाथ शिंदे मजबूर आहेत. उद्धव ठाकरेंवर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. जसं नारायण राणेंचं झालं तसंच शिंदे गटांचं झालंय वाटतं असं म्हणत नीलम गोऱ्हेंनी एकनाथ शिंदेंचा समाचार घेतला. 

महाराष्ट्राचा अभिमन्यू करण्याचा डावमहाराष्ट्राच्या निर्मितीला फार मोठा इतिहास आहे. बिदर भालकी बेळगाव सह अन्य भाग महाराष्ट्राला जोडले गेले पाहिजे ही आपली भूमिका आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार राज्यांची निर्मिती झाली असली तरी बेळगावात मराठीचा अपमान होतो तसा महाराष्ट्रात कानडीचा अपमान होत नाही. सामोपचाराचा वसा केवळ महाराष्ट्राने घेतलेला नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत त्याद्वारे न्याय संस्थेवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचे वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे आहे. ते अगदी हातपाय आपटत आहेत. त्यांच्यामागे नक्कीच कुणीतरी आहे. महाराष्ट्राचा अभिमन्यू करण्याचा हेतू मराठीद्वेषी लोकांचा आहे असं वाटतंय असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. सोलापूरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNeelam gorheनीलम गो-हेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे