शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

बाळासाहेबांचा मुलगा म्हणवता, हिंमत असेल तर...; शिवसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 10:49 IST

बाळासाहेब स्वत: रस्त्यावर उतरले आणि जोडे मारले. केवळ सभेत घोषणा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचा वारसा सांगू नका असा टोला शिवसेना नेते नरेश म्हस्केंनी लगावला.

ठाणे - लाचारांचा नाही, इथं विचारांचा मान, भगवे आमचे रक्त अन् प्राण आमुचे श्री राम....अशा शब्दात शिवसेनेने शहरात बॅनर लावून रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही जणांनी मतांसाठी बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार सोडले. खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडीला लावून बसले. केवळ बेगडी हिंदुत्व दाखवू नका. कृतीत हिंदुत्व आणा. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना आम्ही बाण मारला आहे असा टोला शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. 

नरेश म्हस्के म्हणाले की, केवळ खुर्चीसाठी ज्या राहुल गांधींनी देशात-परदेशात सावरकरांविरोधात वक्तव्ये केली. सावरकरांचा अपमान केला. त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून खुर्चीसाठी उद्धव ठाकरे बसलेत. सावरकरांविरोधात मणिशंकर अय्यर यांनी विधान केले तेव्हा बाळासाहेब स्वत: रस्त्यावर उतरले आणि जोडे मारले. केवळ सभेत घोषणा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचा वारसा सांगू नका. हिंमत असेल तर रस्त्यावर या आणि राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारा. नुसते बेगडी हिंदुत्व स्वीकारले आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्या राहुल गांधींना माफी मागायला सांगा, नाहीतर आघाडी तोडा. बाळासाहेबांचा मुलगा म्हणवता, वारसा सांगता तुमच्यात हिंमत असेल तर राहुल गांधींना माफी मागायला सांगा तरच तुम्ही बाळासाहेबांचा सुपुत्र शोभणार आहे असं आव्हानही शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना दिले. 

सावरकर वादावरून काँग्रेस-ठाकरे गटात तडजोडसातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींविरोधात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत थेट टीका केली. सावरकर हे आमचे दैवत असून त्यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही असा इशाराच त्यांनी दिला. त्यानंतर संजय राऊत यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांशी संवाद साधला. ठाकरेंच्या या मागणीशी राहुल गांधी सहमत दिसले आणि  महाराष्ट्र आणि संसदेची लढाई एकत्र लढायची असेल तर दोन्ही पक्षांना एकमेकांच्या विचारसरणीचा आदर करावा लागेल, अशी सहमती दोन्ही पक्षांमध्ये झाली. मात्र भाजपा-शिवसेनेकडून राज्यात वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे