शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम काेर्टाकडून शिवसेनेला दिलासा नाहीच, अपात्रतेवर सुनावणी ११ जुलैला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 09:18 IST

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून दोन दिवसांचे अधिवेशन होणार आहे. यात विधानसभा अध्यक्ष व शिंदे सरकारवरील विश्वासमताचा ठराव येणार आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेत विश्वासदर्शक ठरावासाठी बंडखोर १६ सदस्यांना मतदानाचा अधिकार देऊ नये, ही शिवसेनेची याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली व यावर पुढील सुनावणी येत्या ११ जुलैला होईल, हे स्पष्ट करून शिवसेनेला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून दोन दिवसांचे अधिवेशन होणार आहे. यात विधानसभा अध्यक्ष व शिंदे सरकारवरील विश्वासमताचा ठराव येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ज्या बंडखोर १६ सदस्यांना अपात्रतेची नोटीस विधानसभा उपाध्यक्षांनी बजावली आहे. त्यांना सभागृहात कामकाजात भाग घेण्याला निर्बंध घालावे, अशी मागणी केली. शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. न्या. सूर्य कांत व न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.राज्यघटनेच्या १० व्या परिशिष्टातील तरतुदी निष्फळ ठरत आहेत. शिवसेनेतून बंडखोरी केलेले सदस्य पक्षांतराचा आनंद घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर सदस्यांना महाराष्ट्र विधानसभा सभागृहात प्रवेश करण्याला बंदी घालावी, अशी मागणी यावेळी सर्वोच्च न्यायालयात केली; परंतु सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला. या सर्व प्रकाराकडे सर्वोच्च न्यायालय उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने यावेळी नोंदविले.अपात्रतेची नोटीस बजावलेले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. हा बंडखोर गट कोणत्याही पक्षात विलीन झालेला नाही. कोणत्या प्रतोदाचा आदेश सदस्यांनी पाळायचा? एकनाथ शिंदे म्हणजे काही पक्ष नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला; परंतु सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेला दिलासा न देता यापूर्वी अपात्रतेच्या नोटिसीवर ठरविलेल्या तारखेवर म्हणजे ११ जुलैला सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे