शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ विस्तार शिवसेनेने रोखला; आता राणेंना मंत्री करण्यासही विरोध

By यदू जोशी | Updated: November 25, 2017 06:51 IST

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यास आणि मंत्री करण्यास शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यास आणि मंत्री करण्यास शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्याकरिता काल ‘मातोश्री’ गाठून शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांना पाठिंब्याचे साकडे घातले होते. नारायण राणे उमेदवार नसतील या अटीवर पाठिंबा देण्याची तयारीठाकरे यांनी दर्शविली होती. त्यावर राणे आमचे उमेदवार नसतील, असा निर्वाळा पाटील-तावडे यांनी दिल्याने पाठिंब्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, ‘राणेंना मंत्रीदेखील करू नका’ असे ठाकरे यांनी या दोन्ही मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत बजावले.‘मातोश्री’वरील या घडामोडीनंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. राणेंना मंत्री करण्यास उद्धव यांचा सक्त विरोध असल्याचे तावडे-पाटील यांनी सांगितल्यानंतर मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला.शिवसेनेचा विरोध पत्करून राणेंना मंत्री करण्याची घाई करू नये, असा भाजपाच्या नेत्यांचा बैठकीत सूर होता. अधिवेशन सुरळीत पार पाडायचे तर शिवसेनेचा विरोध परवडणार नाही. शिवाय, सध्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे दिवस आहेत. या परिस्थितीत ठाकरे आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून आणखीच तोफ डागली गेली तर वातावरण अधिक खराब होईल. हा विचार करून विस्तार अधिवेशनानंतर करावा, असे मत बहुतेकांनी मांडले.कर्जमाफी आणि इतर मुद्द्यांवरून विधिमंडळाच्या अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी हे विरोधी पक्ष सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत. अशा वेळी शिवसेनेच्या विरोधाने विरोधकांना बळ मिळेल. तेव्हा विस्तार नंतरही करता येऊ शकेल, तोवर शिवसेनेचे मन वळविता येऊ शकेल, असे मत भाजपाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केले.>...तर वातावरण अधिक खराब होईल!सध्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे दिवस आहेत. या परिस्थितीत ठाकरे आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून आणखीच तोफ डागली गेली तर वातावरण अधिक खराब होईल. हा विचार करून विस्तार अधिवेशनानंतर करावा, असे मत बहुतेकांनी मांडले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा