शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ एकनाथ शिंदेंच्या गळाला; समर्थक आमदारांची संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 21:18 IST

राज्यात भाजपासोबत मिळून सरकार स्थापन करावं अशी मागणी एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी केले आहे.

गुवाहाटी - एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेत उभी फूट पडल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घातल्यानंतर शिवसेनेचे ३ आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील हे गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. गुलाबराव पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे आणखी २ आमदार होते. 

राज्यात भाजपासोबत मिळून सरकार स्थापन करावं अशी मागणी एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी केले आहे. त्यात आता गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे आमदार योगेश कदम, मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील हे पोहचले आहेत. याठिकाणी गुलाबराव पाटील यांचे सर्व बंडखोर आमदारांनी त्यांचे स्वागत केले आहे. 

काय म्हणाले गुलाबराव पाटील?राज्यात शिवसेना-भाजपाने मिळून सत्ता स्थापन करावी अशी मागणी ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांची आहे. पक्षातील फुट टाळण्यासाठी भाजपसोबत जाण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत माझ्यासह काही आमदारांनी विनंती केली. मात्र,याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यातच सर्वच आमदारदेखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याने सेनेचे हित लक्षात घेवून, शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.

मुख्यमंत्रिपद का स्वीकारलं?सत्तास्थापनेवेळी शरद पवारांनी बैठकीनंतर मला बोलावलं. तेव्हा तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. कारण दोन्ही पक्षात ज्येष्ठ नेते होते. मग जिद्दीने अनुभव नसताना मी जबाबदारी स्वीकारली. राजकारणात वळणं असतात. आजपर्यंत मला प्रशासनाने खूप सहकार्य केले. होय, मला धक्का बसला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगितले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर समजू शकतो. दोघांची विचारसरणी वेगळी आहे. मात्र त्या दोघांनी माझ्यावर भरवसा ठेवल्यानंतर माझ्याच लोकांना मुख्यमंत्री नको असतील तर राजीनामा देण्यास तयार आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. शिवसैनिकांना आवाहनज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास नालायक आहे हे मला सांगावं मी पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे. पण तो खरा शिवसैनिक असावा. मी दोन्ही पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदी आहे. दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. मला फोन करा, चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. संकोच वाटत असेल या क्षणी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. पदे येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जी कामे केली तेच असते असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेGulabrao Patilगुलाबराव पाटीलShiv Senaशिवसेना