शिवसेनेकडून मुंबई महापौर, उपमहापौर पदासाठीचे उमेदवार निश्चित
By Admin | Updated: March 4, 2017 13:57 IST2017-03-04T13:53:33+5:302017-03-04T13:57:02+5:30
शिवसेनेनं मुंबईच्या महापौर व उपमहापौर पदासाठीचे उमेदवार निश्चित केले आहेत.

शिवसेनेकडून मुंबई महापौर, उपमहापौर पदासाठीचे उमेदवार निश्चित
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - शिवसेनेनं मुंबईच्या महापौर व उपमहापौर पदासाठीचे उमेदवार निश्चित केले आहेत. शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर हे महापौर पदासाठी तर हेमांगी वरळीकर या उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. मातोश्रीवर झालेल्या नेत्यांच्या बैठकीत महाडेश्वर आणि वरळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मनोहर जोशी, दिवाकर रावते, सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर, एकनाथ शिंदे, रामदास कदम, संजय राऊत उपस्थित होते.दरम्यान, आज महापौरपदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी सत्तेच्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे.
दरम्यान, विश्वनाथ महाडेश्वर हे महापालिकेत तिसऱ्यांदा निवडून गेले आहेत. त्यांनी शिक्षण समितीचे चेअरमन पद भूषवले आहे. तर हेमांगी वरळीकर यांची ही नगरसेवक पदाची दुसरी टर्म आहे. यापूर्वी त्यांनी शिक्षण समितीचे महापौर पद भूषवले होते.