शिवसेना खा. रवींद्र गायकवाड ब्लॅकलिस्टमध्ये
By Admin | Updated: March 23, 2017 22:15 IST2017-03-23T22:15:11+5:302017-03-23T22:15:11+5:30
घडलेल्या या सर्व प्रकरणावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी गायकवाड यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

शिवसेना खा. रवींद्र गायकवाड ब्लॅकलिस्टमध्ये
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांचे नाव एअर इंडियाने ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. एअर इंडियाच्या या निर्णयामुळे गायकवाड यापुढे कधीही एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू शकणार नाहीत.
घडलेल्या या सर्व प्रकरणावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी गायकवाड यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. तर, शिवसेना कोणत्याही स्थितीत हिंसक वर्तनाचे समर्थन करणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.
माझे बिझनेस क्लासचे तिकीट होते, मात्र मला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितले. यासंदर्भात तक्रार करण्यासाठी कर्मचा-याकडे तक्रार बूक मागितले. यावेळी एअर इंडियाचा तो कर्मचाऱ्यारी अरेरावी करत, माझ्या अंगावर धावून आला. मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असे मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले, असे रवींद्र गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.