शिवसेनेला विकासाशी देणेघेणे नाही-राणे
By Admin | Updated: April 7, 2015 04:26 IST2015-04-07T04:26:58+5:302015-04-07T04:26:58+5:30
मराठी माणसाच्या जीवावर राजकारण करीत असलेल्या शिवसेनेला त्यांच्या विकासासाठी काहीही देणेघेणे नाही. इतकी वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात असूनही

शिवसेनेला विकासाशी देणेघेणे नाही-राणे
मुंबई : मराठी माणसाच्या जीवावर राजकारण करीत असलेल्या शिवसेनेला त्यांच्या विकासासाठी काहीही देणेघेणे नाही. इतकी वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात असूनही त्यांनी मूलभूत सुविधांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या भडकावू राजकारणाला आता जनता भीक घालणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व वांदे्र (पू) पोटनिवडणूकीतील कॉँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी केले. यावेळी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सलमान खुर्शीद यांनी सेना व एमआयएम सारख्या जातीयवादी पक्षापासून मतदारांनी सावध रहावे असे आवाहन केले.
सोमवारी राणे यांनी या परिसरात कॉर्नर सभा घेत सेना-भाजपा आणि एमआयएमच्या धोरणावर तीव्र टीका केली. ते म्हणाले,‘ जातीय राजकारणाला जनता आता कंटाळलेली आहे. मग त्याचा प्रचार आणि प्रसार तो शिवसेना-भाजपाकडून होवो की एमआयएमकडून. त्यांना आता केवळ विकासाची गरज आहे. वांदे्रतील मतदार अनेक वर्षापासून नागरी विकासापासून वंचित आहे. याठिकाणच्या सेनेचे आमदार व नगरसेवकांनी केवळ मतांसाठी त्यांचा वापर करुन घेतला आहे. अल्पसंख्याक समाज कॉँग्रेसच्या पाठिशी असून एमआयएमच्या उमेदवाराचा फायदा जातीयवादी शक्तीला होतो, हे त्यांना समजून चुकले आहे. त्यामुळे पुन्हा ते
चूक करणार नसल्याचे त्यांनी
स्पष्ट केले. (प्रतिनिधी)