शिवसेना जिल्हाप्रमुख गाडे यांना अटक, लोकमत प्रतिनिधीला मारहाण

By Admin | Updated: June 5, 2017 07:26 IST2017-06-05T07:21:41+5:302017-06-05T07:26:53+5:30

शेतकरी आंदोलनात पोलिसांनी रविवारी मध्यरात्री शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांना अटक केली

Shiv Sena district president Gade arrested | शिवसेना जिल्हाप्रमुख गाडे यांना अटक, लोकमत प्रतिनिधीला मारहाण

शिवसेना जिल्हाप्रमुख गाडे यांना अटक, लोकमत प्रतिनिधीला मारहाण

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 5 - शेतकरी आंदोलनात पोलिसांनी रविवारी मध्यरात्री शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांना अटक केली आहे. आंदोलनाची छायाचित्रे घेतली म्हणून लोकमतचे चिचोंडी पाटील प्रतिनिधी अन्सार शेख यांनाही पोलिसांनी मारहाण केली.
नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे जमावाने रात्री दुधाचे टँकर अडविले. यावेळी तेथे गाडे गेले असता त्यांना अटक करण्यात आली. सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनाही धक्काबुक्की झाली. नगर पंचायत समितीच्या उपसभापतींचे पुत्र प्रवीण कोकाटे यांच्या वाहनाचा पोलिसांनी पाठलाग
केला. पोलिसांची रायफल त्यांच्या वाहनात अडकली होती. या सर्व प्रकाराची छायाचित्रे घेतली म्हणून लोकमतचे चिचोंडी पाटील येथील बातमीदार अन्सार शेख यांनाही पोलिसांनी मारहाण केली. त्यांना रात्रभर पोलीस स्टेशनला बसवून ठेवले होते. पोलीस शेतकरी आंदोलनाची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप सेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी केला आहे.

Web Title: Shiv Sena district president Gade arrested