शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर? नेत्यांमध्येच रंगली एकमेकांना शह देण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 06:39 IST

शिवसेना नेत्याकडूनच सोमय्या यांना अनिल परब यांच्याविरोधात रसद?

ठळक मुद्दे‘त्याची १०० टक्के वाट लागली, मेला तो’; ऑडिओ क्लिपमुळे खळबळमाजी आमदार संजय कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत या ऑडिओ क्लिप सादर केल्यापदाचा गैरवापर करून सीआरझेड क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप केला आहे

हर्षल शिरोडकरखेड, (जि. रत्नागिरी) : परिवहनमंत्री अनिल परब यांच्या बांधकामाविषयी माहिती काढून ती भाजप नेते किरीट सोमय्या यांना देण्याचे काम माजी मंत्री रामदास कदम यांनीच केले आहे, याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी शनिवारी येथे केला. 

यावेळी त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता प्रसाद कर्वे आणि किरीट सोमय्या, तसेच प्रसाद कर्वे आणि रामदास कदम यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिपही सादर केली. ‘आता त्याची १०० टक्के वाट लागली, मेला तो...’ असे विधान रामदास कदम यांनी मंत्री परब यांच्याबाबत केल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट ऐकू येत असल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

माजी आमदार संजय कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत या ऑडिओ क्लिप सादर केल्या. कर्वेंमार्फत रामदास कदम यांनी परब यांच्या रिसॉर्टविषयी माहिती काढली. ही माहिती किरीट सोमय्या यांना पुरवून सरकार अस्थिर करण्याचा कदम यांचा प्रयत्न आहे, असा आरोप याआधीच या दोन नेत्यांनी केला होता. त्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या आरोपाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी कर्वे व रामदास कदम तसेच कर्वे व सोमय्या यांच्या  संभाषणाच्या क्लिपही ऐकवल्या.

दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी असलेल्या शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर व परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांच्या बांधकामाची तक्रार सोमय्या यांनी केली होती. पदाचा गैरवापर करून सीआरझेड क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने मुरूड येथील सर्वच व्यावसायिकांना नोटिसा पाठवल्या आहेत. या साऱ्यामध्ये रामदास कदम हे सोमय्या यांना मदत करत आहेत. त्यामुळे बँकांची कर्जे काढून व्यवसाय सुरू करणाऱ्या स्थानिकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शिवसेनेतील स्थान डळमळीत केले म्हणून रामदास कदम हे सोमय्या यांना माहिती पुरवत आहेत, असा आरोपही संजय कदम यांनी केला आहे. कर्वे यांनी या क्लिप खोट्या असून त्याविरोधात आपण कायदेशीर दाद मागणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्षरामदास कदम हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याबाबत मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे आमचे लक्ष लागले आहे, असे संजय कदम म्हणाले.

तुळजा भवानीची शपथ... सोमय्यांशी संपर्क साधला नाही!‘तुळजा भवानीची शपथ, सोमय्यांशी संपर्क साधला नाही’, असे रामदास कदम म्हणाले. या ध्वनिफितींशी माझा संबंध नसून, हे आरोप खोटे आहेत. अनिल परब माझे मित्र आहेत. आरोप करणाऱ्या दोघांनी कधी काळी माझ्या हाताखाली काम केले आहे. त्यांनी शिवसेनेशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. संजय कदम यांना माझ्या मुलाने पराभूत केल्याने ते कुरघोड्या करण्याचे काम करत आहेत, असेही रामदास कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Parabअनिल परबRamdas Kadamरामदास कदम