शिवसेना नगरसेविका हेमांगी चेंबूरकरला लाच घेताना अटक
By Admin | Updated: February 7, 2017 21:45 IST2017-02-07T21:00:13+5:302017-02-07T21:45:16+5:30
नगरसेविका हेमांगी हेमंत चेंबूरकरला हॉटेल मालकाकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी अटक केली

शिवसेना नगरसेविका हेमांगी चेंबूरकरला लाच घेताना अटक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - महापालिका निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपली असताना शिवसेनेच्या नगरसेविका हेमांगी हेमंत चेंबूरकरला हॉटेल मालकाकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी अटक केली आहे. हेमांगी चेंबूरकर या शिवसेनेच्या १९९ च्या विद्यमान नगरसेविका आहेत.
पालिकेच्या एफ दक्षिण आणि उत्तर वॉर्डच्या प्रभाग समिती अध्यक्षा आहेत. त्यांचे पीए राजाराम गोपाल रेडकर त्यांचे संपूर्ण कामकाज पाहतात. त्यांच्याकडे तक्रारदार हॉटेल मालकाविरुद्ध तक्रार अर्ज आला होता. त्या अर्जावरून तक्रार न करण्यासाठी तिने त्यांच्याकडून २५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर १६ हजार रुपयांवर तडजोड झाली.
तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे धाव घेतली. त्यानुसार ठरल्याप्रमाणे मंगळवारी १६ हजारांची लाच घेताना चेंबूरकरला रंगेहाथ अटक करण्यात आली. यामध्ये १५ हजार चेंबूरकर घेणार होत्या, तर १ हजार रुपये पीएला देण्याचे ठरले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने सेनेला धक्का बसला आहे.