शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आला नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शहांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 14:15 IST

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका

मुंबई: काही जण शिवसेनेला पटकण्याची भाषा करतात. मात्र शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीभाजपा अध्यक्ष अमित शहांना लगावला. ते स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनात बोलत होते. यावेळी त्यांनी राम मंदिर, काळा पैसा या मुद्द्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. सरकारनं राम मंदिराच्या मुद्द्याचाही जुमला करुन टाकला, अशी टीका उद्धव यांनी केली. गेल्या आठवड्यात लातूरमध्ये झालेल्या भाजपा मेळाव्यात अमित शहांनी शिवसेनेला थेट इशारा दिला होता. मित्र पक्ष सोबत आला तर ठिक, अन्यथा विरोधकांसह त्यांना धोबीपछाड देऊ, असं शहा म्हणाले होते. युती न केल्यास मित्रपक्षाला पराभूत करु, असा इशारा देताना त्यांनी पटक देंगे असं म्हटलं होतं. त्याला उद्धव यांनी आज उत्तर दिलं. शिवसेनेला पटकणारा अद्याप जन्माला आला नाही आणि येणारही नाही, असा टोला त्यांनी लगावला. सध्या हनुमानाची जात काढली जात आहे. हा प्रकार अतिशय दुर्देवी असल्याचं ते म्हणाले. सरकारसाठी राम मंदिराचा मुद्दादेखील जुमलाच आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'तुमच्या खात्यात 15 लाख येतील हा जुमला होता. मग आता राम मंदिराचा मुद्दा हादेखील निवडणुकीसाठीचा जुमला समजायचा का? राम मंदिराचा विषयही तुम्हाला जुमला वाटत असेल, तर मग जनतेनं तुमच्यावर विश्वास का ठेवायचा?' असे प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केले. काँग्रेसमुळेच राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. त्याचाही समाचार उद्धव यांनी घेतला. 'राम मंदिराच्या निर्मितीत काँग्रेस अडथळे निर्माण करते, असं तुम्ही म्हणता. राम मंदिराच्या उभारणीत अडचणी निर्माण करत असल्यानं देशानं त्यांना सत्तेतून खाली खेचलं आणि तुम्हाला बहुमत दिलं. पण तुम्ही मंदिर उभारल्याचं आम्हाला तरी दिसत नाही,' असं उद्धव म्हणाले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा