शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी सीएमसोबत वाजवला नगारा; संध्याकाळी उद्धव ठाकरेंचा स्वबळाचाच नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 20:31 IST

मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंचे शिवसेना मंत्र्यांना आक्रमक होण्याचे आदेश

मुंबई: आज जवळपास दिवसभर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र होते. वाशिममधील एका कार्यक्रमात या दोघांनी सकाळी एकत्र नगारा वाजवला. मात्र संध्याकाळी स्वपक्षीय मंत्र्यांना अधिक आक्रमक होण्याचे आदेश देत उद्धव यांनी पुन्हा एकदा स्वबळाचाच नारा दिला. त्यामुळे सकाळी निर्माण झालेली युतीची शक्यता संध्याकाळ होताच मावळली. आज संध्याकाळी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर स्वपक्षीय मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे सर्व मंत्री उपस्थित होते. आज सकाळपासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत होते. या दोघांनी कार्यक्रमात एकमेकांचं तोडभरुन कौतुक केलं. ही साखरपेरणी पाहून दोन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता निर्माण झाली होती. उद्धव यांनी संध्याकाळी बोलावलेल्या बैठकीत याबद्दलच चर्चा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांना आणखी आक्रमक होण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना दुष्काळी भागात जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुष्काळी भागाचे दौरे करा. तिथली परिस्थिती पाहा. सरकारी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते आहे का, याचा आढावा घ्या, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुखांनी मंत्र्यांना दिले. निवडणूक जवळ येत असल्यानं अधिकाधिक आक्रमक होण्याचा आदेशदेखील उद्धव यांनी दिला. या बैठकीत उद्धव यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेली युतीची चर्चा पुन्हा एकदा थांबली आहे. आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उद्धव ठाकरे वाशिममध्ये होते. देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे नगारारूपी वास्तूसंग्रहालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला हे दोन्ही नेते उपस्थित होते. यावेळी दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळत संत सेवालाल महाराजांच्या पवित्र भूमित नगारा वाजविला. त्यामुळे भाजपा-सेना युतीचा नगारा वाजल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा