शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटप गेलं खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 17:32 IST

शिवसेना पक्षप्रमुख आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. पंढरपुरात त्यांनी जाहीर सभा घेत भाजपावर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देपंढरपुरात त्यांनी जाहीर सभा घेत भाजपावर निशाणा साधला आहे. शिवसेना-भाजपाच्या 2019च्या लोकसभा आणि विधानसभेच्या संभाव्य जागावाटपावरही भाष्य केलं आहे.जागावाटप खड्ड्यात जाऊ देत, आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

पंढरपूर- शिवसेना पक्षप्रमुख आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. पंढरपुरात त्यांनी जाहीर सभा घेत भाजपावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपाच्या 2019च्या लोकसभा आणि विधानसभेच्या संभाव्य जागावाटपावरही भाष्य केलं आहे. युती होणार का या फालतू चर्चेत मी जात नाही, जागावाटप खड्ड्यात जाऊ देत, आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.पीकविमा योजनेतही मोठा घोटाळा झाल्याचा आरोप पी. साईनाथ यांनी केला आहे. 32 हजार कोटींच्या कर्जमाफीत माझ्या एकाही शेतकरी बांधवाचे कर्ज माफ होत नाही ? हे दुर्दैवी आहे. पीकविम्याचे पैसे केव्हा देताय? कर्जमाफ झालेला शेतकरी कधी दाखवताय ते सांगा, मी सरकारला इशारा देतोय की, कांदा प्रश्न किती दिवसात सोडवताय ते सांगा?, काँग्रेसचं अपत्य तुम्ही का मांडीवर घेता, कशाला त्याला दूध पाजता ?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे :

खास पंढरपूरसाठी विठाई बससेवेचं उद्घाटन

समोरचा गोरगरीब हाच शिवसेनेचा देव.

धनगर समाजाच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी. 

कुंभकर्णाला जागं करायला मी अयोध्येत गेलो होतो. 

राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच 

जे करून दाखवतो तेच बोलतो, जे बोललो ते करून दाखवतो

सर्व जातीपातीच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देणार

राम मंदिर दिखेगा कब ?

बाबरी पाडून घेतली, बाबरीच्या मुद्दावरून गादी बळकावलीत आणि त्यावर  कुंभकर्णासारखे लोळताय ?

सोहराबुद्दीन खटल्यातील सगळे निर्दोष मुक्त झाले, मात्र बाबरी पाडणाऱ्यांविरोधातील खटले अजून सुरू आहेत

30 वर्षे होत आली, आता तुम्ही सांगता की न्यायालयात हा मुद्दा आला आहे?

हिंदू भोळा आहे, मात्र तो बावळट नाही

राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्दावर संसदेत चर्चा होऊन जाऊ दे, एनडीएतील किती पक्ष विरोधात आहे आणि किती समर्थनात आहे हे कळेल.

राम मंदिराबाबत नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांचे मत काय आहे ?

जे नितीश संघमुक्त भारत करायला निघाले होत त्यांच्या मांडीला मांडी लावून भाजप बसलंय.

नितीशकुमार आणि रामविलास यांच्यापुढे भाजपने नमतं घेतलं, चांगली गोष्ट आहे.

शेतकरी हा काही मल्ल्या, मोदी नाही.

गोरगरिबांना नाडण्याचा प्रयत्न केलात तर त्याची गाठ शिवसेनेशी आहे हे लक्षात ठेवा.

गावागावातील शिवसेनेच्या शाखा, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी आधाराचे केंद्र बनेल

शिवसेना निवडणुका बाजूला ठेवून गोरगरिब, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे

पीकविम्याचे पैसे केव्हा देताय? कर्जमाफी झालेला शेतकरी कधी दाखवताय ते सांगा

मी सरकारला इशारा देतोय, कांदा प्रश्न किती दिवसात सोडवताय?

मला जागावाटपात स्वारस्य नाही, शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे

काँग्रेसचं अपत्य तुम्ही का मांडीवर घेता, कशाला त्याला दूध पाजता ?

देवांच्या नावाने जुमला केलात तर तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही

राम मंदिराचा मुद्दा सोडणार नाही, सुटू देणारही नाही

महाराष्ट्रावरचं संकट टाळण्यासाठी पांडुरंग पाहिजे, दुष्काळ निवारणासाठी पांडुरंग पाहिजे तर मग मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडा, पांडुरंगच तिथे बसेल.

शिवसेनेचं राज्य आणणार म्हणजे, आणणारच

छत्तीसगडमधल्या लोकांनी घाण पहिले साफ केली, याला म्हणतात धाडस आणि हे धाडस मला शिवरायांच्या महाराष्ट्राकडून अपेक्षित आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे