शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा रविवारी होणार रवाना
By Admin | Updated: December 31, 2016 22:34 IST2016-12-31T22:33:42+5:302016-12-31T22:34:53+5:30
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून रविवारी कल्याण- डोंबिवलीकडे रवाना होणार आहे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा रविवारी होणार रवाना
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 31 - गेले वर्षभर सुरू असलेल्या शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून, हा पुतळा रविवारी कल्याण- डोंबिवलीकडे रवाना होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील यांनी दिली.
शिये येथील शिल्पकार संताजी चौगले यांच्या कार्यशाळेत गेल्या एक वर्षापासून या पूर्णाकृती पुतळ्याचे काम सुरू होते. यादरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन, कामाची पाहणी करून योग्य त्या दुरुस्त्याही सुचविल्या होत्या. वर्षभराच्या मेहनतीनंतर हा पुतळा आता तयार झाला आहे. आज, रविवारी सकाळी दहा वाजता कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन होईल. त्यानंतर शिये ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांतर्फे ढोल-ताशांच्या गजरात पुतळा येथून रवाना करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.