शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Sena: शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांना आव्हान, सावंतवाडीतील बड्या नेत्याने हाती बांधलं शिवबंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 18:49 IST

Shiv Sena: काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सावंतवाडी तालुक्यातील नेते चंद्रकांत गावडे यांना शिवसेने आज पक्षात प्रवेश दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चंद्रकांत गावडे यांनी हातात शिवबंधन बांधले.

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० च्या आसपास आमदारांनी बंड करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या त्या बंडानंतर आमदार दीपक केसरकर यांनी शिंदे गटाची बाजू समर्थपणे मांडली आहे. दरम्यान, दीपक केसरकर यांना शह देण्यासाठी शिवसेनेकडून मोठी खेळी खेळण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सावंतवाडी तालुक्यातील नेते चंद्रकांत गावडे यांना शिवसेने आज पक्षात प्रवेश दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चंद्रकांत गावडे यांनी हातात शिवबंधन बांधले.

चंद्रकांत गावडे यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, चंद्रकांत गावडे यांनी आज  मातोश्रीवर येत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हाती शिवबंधन बांधले. चंद्रकांत गावडे यांच्यासोबत त्यांचे पुत्र कौस्तुभ गावडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दीपक केसरकर यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. मात्र आता सावंतवाडीमध्ये काँग्रेसमधून एक मोठा नेता शिवसेनेत आल्याने शिवसेनेला बळ मिळाले आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेsindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर