शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजपा महायुतीची पत्रकाद्वारे घोषणा, जागांचा फॉर्म्युला गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 19:55 IST

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

मुंबई - शिवेसना-भाजपा आणि रिपाइं महायुतीची घोषणा करण्यात आली आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या संयुक्त पत्रकाद्वारे महायुतीची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कार्यक्रमात हे युतीचं पत्र जाहीर करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ताक्षराने हे पत्र छापण्यात आलं आहे. या पत्रामध्ये युतीची घोषणा करण्यात आली आहे. पण, जागांचा तिढा अद्यापही गुलदस्त्यात आहे. पण, 124 जागांवर शिवसेनेला राजी करण्यात आल्याचं समजतंय.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, अजूनही भाजप-शिवसेना युतीतील जागावाटाप बाबतचा निर्णय होऊ शकला नव्हता. कटाप्पाने बाहुबलीला का मारले याच्या उत्तराची जेवढी प्रतिक्षा जनतेला होती, तेवढीत युतीच्या निर्णयाचीही प्रतीक्षा महाराष्ट्रातील जनतेला लागून राहिल होती. अखेर, युती होणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर हो... असं मिळालं. त्यामुळे युतीच्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे. 

भाजपा-शिवसेना, शिवसंग्राम, रासपा, आरपीआय, रयतक्रांती संघटना मिळून आगामी निवडणुकीला सामोरं जाणारं आहोत. याबाबत अधिकृत घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात आम्ही जे काम केलं त्याआधारे जनतेचे मत मागणार आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महायुतीला मोठा महाजनादेश मिळणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना, भाजपा , रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुती झाल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. युतीची घोषणा झाली पण भाजपा आणि शिवसेना राज्यातील किती जागांवर निवडणुका लढवणार याचा फॉर्म्युला अद्यापही गुलदस्त्यात आहे. युतीच्या निर्णयावर अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून होते. त्यामुळे युतीची घोषणा होताच बंडखोरी पाहायला मिळणार आहे. पण, यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला होता.विधानसभा निवडणुकीत युती होणार आहे. मात्र युतीनंतर बंडखोरीची शक्यता बिलकुल नाही. त्याचे कारण असे की, भाजप-शिवसेनेचं संघटन संपर्क मोठा असल्याने नाराज नेते आणि कार्यकर्त्यांना समजवण्याची काही व्यवस्था असल्याचे पाटील म्हणाले. तर नाराज होणार हे नैसर्गिक आहे, मात्र ते त्यामुळे बंडखोरी करून दुसऱ्या पक्षात जातील याची शक्यता नसल्याचा दावाही पाटील यांनी केला. जागावाटप पूर्ण झाला असून लवकरच एका पत्रकाच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक