शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजपाची युती होणारच; रावसाहेब दानवे यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 05:42 IST

येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती होणारच असे जाहीर करीत, येत्या २०१९ ची निवडणूक आम्हीच जिंकणार असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालघरमध्ये केला आहे.

पालघर : येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती होणारच असे जाहीर करीत, येत्या २०१९ ची निवडणूक आम्हीच जिंकणार असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालघरमध्ये केला आहे.पालघर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षीय पदाधिकाºयांशी भेटून कामाचे नियोजन आणि जबाबदारी निश्चित करीत, पक्ष बांधणीच्या दृष्टीने पालघरच्या विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, आ.संजय केळकर, आमदार पास्कल धनारे आदी मान्यवर उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मी स्वत: आणि संघटकमंत्री पुराणिक महाराष्ट्राच्या दौºयावर असून, २० जिल्ह्याचा दौरा पूर्ण करीत निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले. २८८ लोकसभा मतदार संघात विस्तारकांची नेमणूक करून बूथ गठन करण्याचे काम हाती घेतले असून, राज्यातील एकूण ९२ हजार बुथपैकी ८८ हजार बुथचे गठन पूर्ण झाल्याचे ते म्हणाले.एक लोकसभेंतर्गत ६ विधानसभा येत असून, प्रत्येक विधानसभेतील ३०० बुथवर एका अध्यक्षांच्या हाताखाली १५ पुरुष आणि १० महिला अशा कार्यकर्त्यांची फळी उभारण्यात आली आहे. त्यामुळे ४० ते ५० लाख कार्यकर्ते निवडणुका जाहीर होताच कामाला सुरुवात करणार असल्याची योजना भाजपाने आखल्याचे त्यांनी सांगितले. या संघटनात्मक बांधणीच्या जोरावर आणि प्रधानमंत्री मोदीवर लोकांचा असलेला विश्वास या जोरावर आम्ही २०१९ची निवडणूक जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला. बुलेट ट्रेन उभारणीत शेतकºयांच्या जमिनी गेल्याने त्यांचा विरोध होणारच, पण आमचे सरकार यातूनही मार्ग काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.भाजपाचीच सत्ता येणारकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत सध्या ताळमेळ राहिला नसून, पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? यावरून भांडणे सुरू आहेत. पाच राज्यांत झालेल्या निवडणुकीच्या एक्झिट पोलबाबत त्यांना छेडले असता, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकांचा एक्झिट पोल भाजपाच्या विरोधात असताना दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा