शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत शिवसेना, भाजपची युती, संदेश पारकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 19:28 IST

कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी अखेर शिवसेना व  भाजपची १३ जागांसाठी युती झाली आहे.  

कणकवली  -  कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी अखेर शिवसेना व  भाजपची १३ जागांसाठी युती झाली आहे.   भाजप ८ तर शिवसेना ५ जागा लढविणार असून इतर ४ जागांसाठी बोलणी सुरु असून २६ मार्च प्रयत्न त्याबाबत निर्णय होईल. असे सांगतानाच शिवसेना -भाजप युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकरच असतील असे  शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक व भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहिर केले.यावेळी भाजप नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, जयदेव कदम, प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष संदेश पटेल, राजन चिके, रविंद्र शेट्ये , शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख सचिन सावंत, राजू राठोड, भास्कर राणे आदी उपस्थित होते.यावेळी प्रमोद जठार म्हणाले , कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना व भाजप मध्ये १३ जागांसाठी तडजोड झाली आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढणार आहोत. उर्वरित जागांवर बोलणी सुरु आहेत. त्याबाबतही लवकरच निर्णय होईल. मंगळवारपासून शिवसेना भाजपचे सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे निवडणुकीचा प्रचार करतील. वैभव नाईक म्हणाले, शहराच्या विकासासाठी प्राधान्य देवून आम्ही भाजप सोबत युती केली आहे. उर्वरित जागांचा प्रश्न लवकरच निकाली लागेल. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत युती सर्व जागांवर विजयी होईल. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी !कणकवलीतील जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे.त्यामुळे  शिवसेना  -भाजप युतीचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील. याच शहराने माझे नेतृत्व घडविले आहे. विकासाच्या मुद्यावर आम्ही ही निवडणूक लढवित आहोत. जनता युतीचाच  नगराध्यक्ष  निवडून देईल. त्यामुळे कणकवली हे जिल्ह्यातील एक आदर्श शहर बनवू.असे संदेश पारकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाBJPभाजपा