शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तुला बघतोच आता...; भास्कर जाधव आणि राम कदम सभागृहातच भिडले, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 20:19 IST

राम कदम यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भास्कर जाधव यांचा पारा चढला.

Bhaskar Jadhav: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप आमदार राम कदम यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना काळातील कामगिरीवरून लक्ष्य केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते भास्कर जाधव भलतेच आक्रमक झाले. "तुला बघतोच आता," असं म्हणत भास्कर जाधव यांनी आमदार कदमांवर शा‍ब्दिक हल्ला चढवला. 

"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याकडे एवढीच मागणी केली होती की, मुंबईतील व्हेंटिलेटरची संख्या वाढवा. पण त्यांनी ती वाढवली नाही. व्हेंटिलेटरची संख्या वाढवली असती तर या मुंबईत कोरोना काळात ११ हजार लोकांचे मुडदे पडले नसते. पण उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं की उभा राहून बोललंच पाहिजे, असा दबाव उबाठा गटातील लोकांवर आहे," अशी टीका आमदार राम कदम यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना भास्कर जाधव यांचा पारा चढला.

राम कदमांवर पलटवार करताना भास्कर जाधव म्हणाले की, "राम कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन अनेक आरोप केले. पण ज्या व्यक्तीला या सभागृहात येऊन आपल्यावरील आरोपांना उत्तर देता येत नाही, त्यांचा नामोल्लेख करायचा नसतो, ही प्रथा आहे की नाही? हा नियम आहे की नाही? हे पावित्र्य पाळलं गेलं का?," असे प्रश्न आमदार जाधव यांनी उपस्थित केले. मात्र जाधव यांचं भाषण सुरू असतानाच पुन्हा राम कदम बोलण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर भडकलेल्या भास्कर जाधवांनी थेट "बघतोच तुला आता" असं म्हणत राम कदमांना आक्रमक इशारा दिला.

"कधीकधी आपण आपल्या नेत्याची इतकी चापलुसी करतो, इतकी हांजीहांजी करतो आणि त्यातून आपल्याला वाटतं की आपले नेते खूश होतील. पण यातून आपण आपल्याच नेत्याची प्रतिमा खराब करत असतो," असा टोलाही यावेळी भास्कर जाधव यांनी आमदार कदम यांना लगावला. 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवRam Kadamराम कदमMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी