शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या इशाऱ्यावर शिवसेना नांदेड महानगरपालिकेच्या मैदानात, मुख्यमंत्र्यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 14:16 IST

काँग्रेसच्या इशाऱ्यावर शिवसेना नांदेड महानगरपालिकेच्या मैदानात उतरली आहे. नांदेडमधील शिवसेना अशोक चव्हाण यांच्या तालावर नाचणारी आहे, केवळ भाजपाला पराभूत करण्यासाठीच शिवसेना...

नांदेड - काँग्रेसच्या इशाऱ्यावर शिवसेना नांदेड महानगरपालिकेच्या मैदानात उतरली आहे. नांदेडमधील शिवसेना अशोक चव्हाण यांच्या तालावर नाचणारी आहे, केवळ भाजपाला पराभूत करण्यासाठीच शिवसेना नांदेडमध्ये निवडणूक लढवत आहे, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. नांदेड-वाघाळा महानगपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री नांदेडमध्ये आले होते. काँग्रेसला केवळ पैसे खाण्यासाठी सत्ता हवी आहे. मात्र यावेळी काँग्रेसच्या नांदेडच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं कमळ फुलेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.  सात्यत्याने भाजपा आणि मोदींविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी प्राचारसभेदरम्यान भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. तसेच नांदेडमध्ये लढण्यासाठी भाजपाला उमेदवार मिळत नसल्याचा आरोप केला होता. दरम्यान,  भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्र सोडणाऱ्या उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट लक्ष्य केले. "नांदेडमधील शिवसेना अशोक चव्हाण यांच्या तालावर नाचणारी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या इशाऱ्यावर शिवसेना नांदेड महानगरपालिकेच्या मैदानात उतरली आहे.  केवळ भाजपाला पराभूत करण्यासाठीच शिवसेना नांदेडमध्ये निवडणूक लढवत आहे. मात्र त्यांना फारसे यश मिळणार नाही," असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी नांदेड महानगरपालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही मुख्यमंत्र्यांनी टीकेचे लक्ष्य केले." अशोक चव्हाणांनी केवळ नांदेडच्या अधोगतीचे काम केले आहे. मात्र आता काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काँग्रेसला फक्त पैसा खाण्यासाठी सत्ता हवी आहे. काँग्रेसला विकास नव्हे तर कमिशनमध्येच जास्त रस आहे," असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. नांदेडमध्ये प्रचार करताना उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारभारावही उद्धव ठाकरेंची टीका केली. "राज्य सरकारच्या कारभारामुळे राज्यातून विकासासोबत प्रकाशही गायब झाला आहे. अंधाराचे राज्य निर्माण झाले आहे. दुसरीकडे सरकारकडून सौभाग्य योजनेची घोषणा झाली आहे. पण आधी वीज तर द्या, असा टोला त्यांनी लगावला." सध्या गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साडे तीन वर्षांनंतर आपली शाळा आठवली आहे. असा चिमटा उद्धव यांनी काढला होता.नांदेडमध्ये भाजपाला मदत करणारे आमदार प्रताप चिखलीकर यांच्यावरही उद्धव ठाकरेंनी नाव न घेता टीका केली," सर्वत्र सत्ता मिळवूनही भाजपाला नांदेडमध्ये उमेदवार सापडलेले नाहीत. भाजपाच्या लाटेतही केवळ शिवसैनिक म्हणून मतदारांनी तुम्हाला निवडून दिले आहे. आता नांदेडमध्ये वाघांना मत द्यायचे की बेडकांना हे तुम्ही ठरवा. शिवसेनेच्या वाघांनाच मत द्या, असे आवहनही. त्यांनी केले." तसेच राज्यातील सरकारला वाचवणारे हात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील असल्याची टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक