शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Maharashtra Election 2019 : शिवसेनेने दहा रुपयांत जेवण योजना परस्परच जाहीर केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 05:42 IST

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नाराजी

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : दहा रुपयात जेवण आणि एक रुपयात आरोग्य तपासणी ही शिवसेनेची योजना आमच्याशी चर्चा करुन केली असती तर ती व्यापक स्वरुपात भाजपने देखील आपल्या जाहीरनाम्यात मांडली असती. मात्र, त्यांनी तसे विचारले नाही. अर्थात, ती त्यांची भूमिका आहे. त्यावर मी जास्त बोलणे योग्य नाही, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.एकनाथ खडसे यांचेतिकीट का कापावे लागले?मागच्या काही प्रकरणानंतर खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याची चौकशी सुरु आहे. प्रकरण न्यायालयात आहे. पण हा सगळा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आणि राष्टÑीय अध्यक्षांचा आहे. त्यावर तेच जास्त चांगले सांगू शकतील. मात्र, खडसे यांच्या मुलीला पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांना डावलले असा त्याचा अर्थ होत नाही.शिवसेनेने आपलाच मुख्यमंत्रीहोणार असे सांगणे सुरु केलेआहे. तुम्ही याकडे कसे पाहाता?शिवसेना युतीमध्ये असली तरी तो स्वतंत्र पक्ष आहे. काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा स्वत:चा प्रश्न आहे. मात्र, निकालानंतर काय होणार, हे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ठरले आहे. आणि जसे ठरले आहे तसेच होणार आहे.शिवसेनेने दहा रुपयात जेवणआणि एक रुपयात आरोग्यतपासणी अशी घोषणा केलीआहे, ती तुम्हाला मान्य आहे का?आम्हाला विश्वासात घेऊन ही घोषणा करायला हवी होती. आम्ही दोघे युतीमध्ये आहोत, सरकारमध्ये आहोत, तेव्हा त्यांनी चर्चा करुन घोषणा केली असती तर अधिक चांगले झाले असते. मात्र, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांची भूमिका वेगळी असू शकते.शरद पवार यांच्यावर ईडीचीकारवाई झाल्यानंतरपवारांविषयी राज्यभर सहानुभूतीनिर्माण झाली. मोठ्या प्रमाणावरतरुण रस्त्यावर उतरला, हीकारवाई करण्याची राजकीय चूकझाली असे वाटते का?ही राजकीय चूक नाही. न्यायालयाच्या माध्यमातून आलेल्या आदेशाचे पालन आहे. पीआयएल मध्ये झालेल्या तक्रारीत शरद पवार यांचे नाव होते. त्याअनुषंगाने न्यायालयाचे आदेश आले, त्यात सरकार आले कुठे? मी राज्यभर फिरत आहे. या घटनेचा राष्टÑवादीला किंवा शरद पवार यांना फायदा होत आहे, असे मला कुठेही दिसत नाही. काडीचाही संबंध वाटत नाही.भाजपमध्ये आलेले उदयनराजेयांना तुम्ही लोकसभेची उमेदवारीदिली आहे. मात्र, ते अडचणीतअसल्याची चर्चा आहे. त्यांचीजागा निवडून येणार नाही, असेसांगितले जाते. त्यांना भाजपमध्येघेणे चूक झाली असे वाटते का?अजिबात नाही. निकालावरुन लोकांना कळेलच. उदयनराजेनिवडून येणारच आहेत. त्यांची लोकप्रियता तशीच आहे. ते मागच्या वेळेपेक्षाही चांगल्या मतांनी निवडून येतील.तुम्ही राज्यभर फिरत आहात,निवडणुकीच्या प्रचारात तुमचादिनक्रम नेमका कसा असतो?शेड्यूल असे राहिलेले नाही. सकाळी उठल्यापासून रात्री उशीरापर्यंत भेटीगाठी, बैठका, प्रचाराचे नियोजन यात वेळ कसा जातो, ते कळत नाही. अनेकदा जेवणही वेळच्या वेळी मिळत नाही. २४ तासात फार तर ३ ते ४ चार झोप मिळते. प्रत्येक ठिकाणी आम्ही गेले पाहिजे, असे वाटते. बंडखोरांची नाराजी कमी करणे, यासाठी खूप वेळ द्यावा लागतो.या पाच वर्षाच्या काळात कायमलक्षात राहिलेले कोणते कामतुम्ही सांगाल?कामं अनेक आहेत. मात्र, सांगली, सातारा, कोल्हापूरला पूर आला तेव्हा सांगलीवाडी या गावी मी धावून गेलो. पाण्यातून जात असताना काही मगरी देखील तिथे होत्या. मात्र, मी आणि माझ्यासोबत तेथील पोलीस प्रमुख लोकापर्यंत पोहोचलो आणि त्यांना मदत देऊ शकलो. केरळला देखील वैद्यकीय पथक महाराष्टÑातून नेले. तेथेही मला मदत करता आली.अण्णा हजारेंच्या आंदोलनावेळी मी अनेकदा मध्यस्थी केली, अशा अनेक आठवणी आज मनाला कायम लोकांसाठी धावून जाण्याचा धडा देत राहतो.सार्वजनिक आरोग्य आणिवैद्यकीय शिक्षण हे दोनविभाग वेगवेगळे झाल्यामुळेराज्यातल्या आरोग्य सेवेवरपरिणाम झाला आहे. हे दोनविभाग एक असावे, असेआपणास वाटते का?तुम्ही म्हणता ते खरे आहे. ते दोन्ही विभाग एकमेकाशी संलग्न आहेत. दोन वेगळे विभाग असल्यामुळे फाईली फिरत राहतात. निर्णयांना विलंब होतो. वेळ जातो. म्हणूनदोन्ही खाती एक असावी, असे माझे मत आहे. माजी आरोग्य मंत्रीदीपक सावंत यांचीही तीचभूमिका होती. नव्या सरकारमध्ये देखील मुख्यमंत्र्यांना यासाठीआग्रही भूमिका घेईल. कोणाकडेही हे खाते असावे. पण ते एकाकडेच असावे.आपल्या काळात नाशिकमध्ये महिंद्राचा प्रकल्प आला. मात्र, आता महिंद्राने ४० टक्के उत्पादन कमी केले आहे. उद्योग क्षेत्रात वातावरण चिंतेचे आहे. त्याविषयी काय सांगाल?महाराष्टÑात काही ठिकाणी मंदीचे वातावरण दिसत आहे. महिंद्राचे लोकही माझ्याकडे आले होते. खूप गाड्या पडून आहेत. त्यांना मार्केट नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण ही इथेच आहे असे नाही. देशभरात हे चित्र आहे. मात्र, बाहेरच्या देशापेक्षा आपण खूप सुखी आहोत. थोड्याच कालावधीत यातून मार्ग निघेल. नाशिकमध्ये लेबर प्रॉब्लेम आहे, हे मान्य आहे. लवकरच त्यावर तोडगा निघेल. उद्योग आणि कामगार संघटना दोघांमध्येही अडचणी आहेत. संघटनांनी उद्योग बंद पडतील, अशी अडेलतट्टूपणाची भूमिका घेतली तर कसे चालेल. दोघांमध्ये समन्वय साधून मार्ग निघाले पाहिजे.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाGirish Mahajanगिरीश महाजन