शिवसेना आघाडीत नियुक्त्यांवरून नाराजी
By Admin | Updated: May 3, 2017 03:19 IST2017-05-03T03:19:29+5:302017-05-03T03:19:29+5:30
शिवसेना महिला आघाडीमध्ये अंतर्गत गटबाजी वाढून मर्जीनुसार पदाधिकारी नियुक्तीच्या धोरणामुळे निर्माण झालेली नाराजी

शिवसेना आघाडीत नियुक्त्यांवरून नाराजी
औरंगाबाद : शिवसेना महिला आघाडीमध्ये अंतर्गत गटबाजी वाढून मर्जीनुसार पदाधिकारी नियुक्तीच्या धोरणामुळे निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी खा. चंद्रकांत खैरे यांनी पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली; परंतु त्यानंतरही नाराजी कायम आहे.
महिला आघाडीच्या नाराज पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर खा. खैरे यांनी तातडीने बैठक घेतली. खैरे म्हणाले, पक्ष बांधणीसाठी महिलांनी पुढे यावे. कलह निर्माण करणारे काही विरोधक असले तरी ते शांत होतील. आजकाल काही पक्ष (भाजपाचे नाव न घेता) पैसा, सत्ता, पद, आश्वासनाच्या जोरावर कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचे इव्हेंट साजरे करीत आहेत. जिल्हा संघटक रंजना कुलकर्णीसह इतर शाखा संघटकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)