कोल्हापुरात ‘फॅब इंडिया’च्या शोरूमवर शिवसैनिकांचा हल्ला
By Admin | Updated: April 7, 2015 04:13 IST2015-04-07T04:13:47+5:302015-04-07T04:13:47+5:30
चेंजिंग रूममध्ये तरुणीचे व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या ‘फॅब इंडिया’च्या शोरूमवर शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी हल्ला केला.

कोल्हापुरात ‘फॅब इंडिया’च्या शोरूमवर शिवसैनिकांचा हल्ला
कोल्हापूर : चेंजिंग रूममध्ये तरुणीचे व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या ‘फॅब इंडिया’च्या शोरूमवर शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी हल्ला केला. हे शोरूम गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने दुकानाच्या फलकाचे दहन करून निषेध करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी ‘फॅब इंडिया’च्या चेंजिंग रूममध्ये गेलेल्या तरुणीचे चित्रीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. गोव्यातही ‘फॅब इंडिया’मध्ये छुप्या कॅमेऱ्याचा प्रकार घडल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी ताराबाई पार्कातील शोरूमवर हल्ला केला. दुकान बंद असल्याने कार्यकर्त्यांनी शोरूमच्या दरवाजावर दगड घालून तोडफोड केली, तसेच दुकानाच्या नावाच्या फलकाचे दहन करण्यात आले. (प्रतिनिधी)