शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

...तर शिवजयंती 365 दिवस साजरी व्हायला हवी- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 13:28 IST

आपण वर्षभर हिंदू धर्मामध्ये जे सण साजरे करतो. ते सर्वच्या सर्व सण तिथीनुसार साजरे करतो.

ठळक मुद्देशिवजयंती हा एक सण आहे, तो तिथीनुसारच साजरा व्हायला हवा. 365 दिवस शिवजयंती साजरी करायला हवी, असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.आपण वर्षभर हिंदू धर्मामध्ये जे सण साजरे करतो. ते सर्वच्या सर्व सण तिथीनुसार साजरे करतो.

औरंगाबादः शिवजयंती हा एक सण आहे, तो तिथीनुसारच साजरा व्हायला हवा. 365 दिवस शिवजयंती साजरी करायला हवी, असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. ते औरंगाबादेतल्या मनसेच्या कार्यक्रमात बोलत होते. कोरोनाबद्दल सर्वांनी काळजी घेण्याचंही त्यांनी आवाहन केलं आहे. आपण वर्षभर हिंदू धर्मामध्ये जे सण साजरे करतो. ते सर्वच्या सर्व सण तिथीनुसार साजरे करतो.आपण दिवाळी तारखेनुसार साजरी करत नाही. गणेशोत्सव हा तारखेनुसार साजरा करत नाही. आपला कुठलाच सण तारखेनुसार नसतो. प्रत्येक सण हा तिथीनुसारच साजरा केला जातो. आजचा दिवस महाराजांची जयंती ही कोणा एकाची जयंती नाही. ही महापुरुषाची जयंती आहे आणि तो आपला सण आहे. त्यामुळे तो सणासारखाच साजरा झाला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा शिवजयंती उत्सव जोरात साजरा होईल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

आधीच देशात इतकी रोगराई, त्यात आणखी वाढ... काय फरक पडतो?; 'कोरोना'वरून राज ठाकरेंची टिप्पणी

या कार्यक्रमात राज ठाकरेंनी कोरोना व्हायरसवर भाष्य केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा शिवजयंती उत्सव जोरात साजरा होईल. कोरोना व्हायरसमुळे कशी काय शिवजयंती साजरी करायची, असं लोकांनी मला सांगितलं. मी म्हटलं, आधीच या देशात इतकी रोगराई आहे, त्यात आणखी एक वाढ, त्याने काय फरक पडतो, तुम्ही काळजी घेतली पाहिजे, याबद्दल काही प्रश्न आणि वाद नाही, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. मनसेनं शिवजयंतीचा सण धूमधडाक्यात साजरा केला असून, औरंगाबादेतल्या मनसेच्या कार्यक्रमाला राज ठाकरेंनीही उपस्थिती दर्शवली आहे. तसेच संध्याकाळी शोभायात्राही काढली जाणार आहे.आणखी महत्त्वाच्या बातम्या

शिवसेनेत एक वर्षही पूर्ण न झालेल्या नेत्याला राज्यसभेचं 'बक्षीस'; ज्येष्ठांना डावललं

coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये काेराेनाचे तीन रुग्ण ; पालिकेकडून खबरदारीचे उपाय

Breaking : ना खडसे, ना काकडे; राज्यसभेसाठी भाजपाचं तिसरं 'तिकीट' तिसऱ्याच नेत्याला!

'मिनिमम बॅलन्स'बद्दल स्टेट बँकेचा मोठा निर्णय; वाचून होईल 'मॅक्झिमम' आनंद

पुण्यातील 'त्या' ‘कोरोना’ग्रस्ताचा फोटो व्हायरल, फेसबुक युजरविरुद्ध तक्रार

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबाद