शिरूरच्या नगरसेवकाचा निर्घृण खून

By Admin | Updated: August 28, 2016 19:28 IST2016-08-28T19:28:51+5:302016-08-28T19:28:51+5:30

माजी उपनगराध्यक्ष महेंद्र हिरामण मल्लाव (वय ४७) यांचा आज दुपारी भरदिवसा बाजारपेठेत तीक्ष्ण हत्यारांनी निर्घृण खून करण्यात आला.

Shirur's corporator's murderous blood | शिरूरच्या नगरसेवकाचा निर्घृण खून

शिरूरच्या नगरसेवकाचा निर्घृण खून

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 28 -शिरूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र हिरामण मल्लाव (वय ४७) यांचा आज दुपारी भरदिवसा बाजारपेठेत तीक्ष्ण हत्यारांनी निर्घृण खून करण्यात आला. या घटनेनंतर मल्लाव यांच्या समाजाचे लोक, तसेच नातेवाईक यांनी पोलीस ठाण्यात घुसून पोलीस ठाण्याची तोडफोड केली. या संतप्त जमावाला पाहून पोलिसांना पलायन करावे लागले. काही पोलिसांना मारही बसला.
या घटनेनंतर काही तास उलटूनही पोलिसांची जादा कुमक येथे पोहोचली नाही. प्रक्षुब्ध जमाव शांत होण्यास तयार नव्हता. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना आमच्या हवाली करा, अशी एकच मागणी जमाव करीत होता. माझ्या भावाच्या जिवाला धोका असल्याची लेखी तक्रार पोलिसांत केली होती. पोलिसांनी मात्र याची दखल न घेतल्याने माझ्या भावाचा खून झाला, असे मल्लाव यांचा भाऊ दिनेश मल्लाव ओरडून सांगत होता. जमाव रस्त्यावर ठिय्या मांडून होता. या वेळी यवत पोलीस ठाण्याची गाडी तेथे आली असता, जमावाने गाडीवर दगडफेक करून गाडी पलटी केली. यामुळे एस.आर.पी.च्या तुकड्या येथे मागवण्यात आल्या. संंपूर्ण जिल्ह्यातून पोलीस शिरूरकडे निघाल्याचे साडेपाच वाजण्याच्या सुमारास समजले.
दरम्यान, भरदिवसा घडलेल्या निर्घृण खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण गाव भीतीने बंद करण्यात आले. जोपर्यंत गावडेंना हवाली करत नाही, आरोपींना अटक करीत नाही, तोपर्यंत बॉडी (मृतदेह) ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली आहे. येथील रामआळी भागात ही घटना घडली. मल्लाव हे एक अंत्ययात्रा आटोपून अ‍ॅक्टीव्हावर घरी निघाले असता, दोन दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांच्या डोक्यावर मोठे प्रहार करण्यात आल्याने त्यांचा मेंदू बाहेर पडला. हात तुटला. रक्ताच्या थारोळ्यात मल्लाव जागीच मृत पावले.

Web Title: Shirur's corporator's murderous blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.