शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

शिरूर तालुक्यात काँग्रेस एकीला सुरूंग

By admin | Updated: October 31, 2016 01:18 IST

काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाची निवड करताना विश्वासात घेतले नाही.

शिरूर : काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाची निवड करताना विश्वासात घेतले नाही. तसेच निष्ठावान, सक्षम कार्यकर्ते सोडून नातेसंबंध जोपासत आपल्याजवळच्या व्यक्तीला जिल्हाध्यक्षांनी अध्यक्षपद बहाल केले, असा आरोप करीत तालुक्यातील ज्येष्ठ व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आज पदाचे व सदस्यत्वाचे राजीनामे दिले. जिल्हा युवकचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही या कारणास्तव राजीनामा दिला आहे.आज पत्रकार परिषदेत जिल्हा युवकचे अध्यक्ष कंद, तालुकाध्यक्ष विजेंद्र गद्रे व ज्येष्ठ नेते सुरेश थोरात यांनी राजीनाम्याची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याकडे राजीनामे पाठविण्यात आले असून याबाबत ज्येष्ठ नेत्यांकडेही राजीनामे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्हाध्यक्ष जगताप यांनी तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी नुकतीच सणसवाडी येथील वैैभव यादव यांची नियुक्ती केली. या नियुक्तीवर नाराज झालेल्या तालुक्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामे दिले. याबाबत कंद म्हणाले, ‘‘तालुकाध्यक्ष निवडीबाबत विश्वासात घेतले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र या निवडीबाबत तालुक्यातील कोणालाही विश्वासात घेण्यात आले नाही.’’ थोरात म्हणाले, ‘‘तालुक्याची कसलीही माहिती नसलेल्या, राजकीय गोष्टींची पार्श्वभूमी नसणाऱ्या, तसेच पक्षाला फारसा परिचित नसलेल्या व्यक्तीला तालुका काँग्रेसचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. ही निवड पूर्णपणे चुकीची असून तालुक्यात गेली ३० ते ३५ वर्षे प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस जिवंत ठेवणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून ही निवड करण्यात आली आहे.’’ गद्रे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीच्या शिफारशीवर जगताप यांनी यादव यांची निवड केली आहे. काँग्रेसच्या एकाही सदस्याने अथवा नेत्याने त्यांची शिफारस केलेली नाही. जगताप यांचा मनमानी पद्धतीने तालुकाध्यक्षाची निवड केली असल्याचा सर्वांनी आरोप केला.’’ यादव यांची निवड रद्द करून तालुक्यातील ज्येष्ठ, निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन योग्य व्यक्तीची निवड करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.कंद यांच्यासह तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अ‍ॅड़ दिलीप करंजुळे, युवक तालुकाध्यक्ष (शिरूर-हवेली) विजेंद्र गद्रे, सेवादलाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब फडतरे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा शोभाताई वाघचौरे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुरेश थोरात, युवकचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र मांढरे, माजी शहराध्यक्ष रुपेश गंगावणे, तालुका उपाध्यक्ष महेश जगदाळे, युवक शहराध्यक्ष अमजद पठाण, नवनाथ सासवडे, भाऊसाहेब साकोरे, अनिल सातव, चंद्रकांत सकट, सतीश वाबळे, शशिकला सातपुते, बापू ओव्हाळ आदींनी आपल्या पदाचे व काँग्रेस सदस्यत्वाचे राजीनामे दिले. >काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची २ महिन्यांपूर्वी शहरात निर्घृण हत्या झाली. १५ दिवसांपूर्वी काँग्रेसचे शहराध्यक्ष केशरसिंग परदेशी यांचे निधन झाले. मात्र पक्षाच्या या निष्ठावंतांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन करण्याचे मोठेपण संजय जगताप यांना दाखवता आले नाही. ज्येष्ठ नेत्यांबद्दल अशी भावना असेल तर कार्यकर्त्यांबद्दल त्यांना काय आदर असणार, असा संतप्त सवालही पत्रकार परिषदेत करण्यात आला.